VIDEO : धर्म आणि विज्ञानचा संयोग! चंद्रयान 3 मोहीमेपूर्वी इस्त्रोचे शास्त्रज्ञ तिरुपतीत बालाजी चरणी लीन
Chandrayaan 3 : इस्त्रोचे चंद्रयान इतिहास घडवण्यासाठी सज्ज झाले आहेत. त्यापूर्वी चांद्रयान 3 मोहीमेपूर्वी इस्त्रोचे शास्त्रज्ञ Chandrayaan 3 चे छोटं मॉडेल घेऊन तिरुपतीत बालाजी चरणी लीन झाले.
Chandrayaan 3 : प्रत्येक भारतीयाला ज्या क्षणाची प्रतीक्षा होती तो क्षण जवळ आला आहे. इस्त्रोचे चंद्रयान 3 इतिहास घडवण्यासाठी सज्ज झाले आहेत. उद्या म्हणजे शुक्रवारी 14 जुलै 2023 ला दुपारी 2 वाजून 35 मिनिटांनी श्रीहरिकोटामधील सतीश धवन अंतराळातून झेपवणार आहे. चार वर्षांपूर्वी पाहिलेलं चंद्रावर जाण्याचं अधुरं राहिलेलं स्वप्न पूर्ण होणार आहे. मशीन चंद्रयान यशस्वी होण्यासाठी इस्त्रोच्या शास्त्रज्ञांनी विज्ञान आणि धर्माची जोड दिली. (chandrayaan 3 a team of isro scientists at tirupati temple and launch mission countdown begins )
हे मशीन कुठल्याही निर्विघ्नशिवाय यशस्वी होण्यासाठी शास्त्रज्ञांची टीम चंद्रयान 3 चं छोटं मॉडेल घेऊन तिरुमल्लाला जाऊन बालाजी चरणी नतमस्तक झाले. ही मोहीम यशस्वी झाल्यास भारतही चंद्रावर जाणाऱ्या देशांच्या यादीत जाऊन विराजमान होईल.
इस्त्रो तिसऱ्या चंद्र मोहीम यशस्वी करण्यासाठी सज्ज झाली असून यावेळी कुठल्याही अडथळ्याशिवाय ही मोहीम यशस्वी करण्यासाठी शास्त्राज्ञांनी दिवसरात्र एक केला आहे. काही त्रुटीमुळे चंद्रयान 2 अयशस्वी राहिली होती. यावेळी चंद्रयान -3 द्वारे चंद्राच्या पृष्ठभागाचा आणि वातावरणाचा अभ्यास करण्यात येणार आहे.
कशा प्रकारे होणार चांद्रयान लाँच?
चांद्रयानची लँडिंग प्रक्रिया ही दहा टप्प्यांमध्ये करण्यात येणार असल्याचं शास्ज्ञांनी सांगितलं आहे. यातील पहिला टप्पा हा पृथ्वी पार करणं असणार आहे. या टप्प्यात लाँचच्या आधीची स्टेज, उपग्रह आणि रॉकेट अवकाशात उडवणे आणि पृथ्वीच्या विविध कक्षांमधून हे रॉकेट पुढे पाठवणे या गोष्टी असतात. या प्रक्रियेत चांद्रयान पृथ्वीच्या भोवती सहा वेळा चकरा मारतो.
चांद्रयानाचा दुसरा टप्पा म्हणजे तो चंद्राच्या दिशेने ढकलला जातो. तर तिसऱ्या टप्प्यात चांद्रयान चंद्राच्या गुरुत्वाकर्षण कक्षेत जातं. चौथ्या टप्प्यात चांद्रयान चंद्राच्या पृष्ठभागापासून 100 किमी अंतरापर्यंत नेलं जातं. या टप्प्यात चांद्रयान सात ते आठ वेळा चंद्राभोवती फिरतं.
तर पाचव्या टप्प्यामध्ये प्रोपल्शन मॉड्यूल आणि लूनार मॉड्यूल एकमेकांपासून वेगळे होतात. सहावा टप्पा डी-बूस्ट फेज होते. या टप्पात चांद्रयानाची गती स्लो करण्यात येते. सातवा टप्प्यात प्री-लँडिंग फेज असून यात लँडिंगची तयारी केली जाते.
आठव्या टप्प्यात हे चांद्रयान चंद्राच्या पृष्ठभागावर लँड होतं. नवव्या टप्प्यात लँडर आणि रोव्हर चंद्राच्या पृष्ठभागावर उतरून अभ्यासाला सुरुवात होते. दहाव्या आणि शेवटच्या टप्प्यात प्रोपल्शन मॉड्यूल चंद्राच्या 100 किलोमीटर कक्षेत पुन्हा परत जातं.
मोहीमेला किती कालावधी लागतो?
या सर्व प्रक्रियेला पूर्ण होण्यासाठी जवळपास 45 ते 50 लागेल अशी माहिती इस्त्रोच्या शास्त्रज्ञांनी दिली आहे.