Chandrayaan 3: `चांदोबा, आम्ही येतोय!` प्रक्षेपणानंतर सोशल मीडियात उत्साह, जुने व्हिडीओही केले शेअर
Chandrayaan 3: चांद्रयान-2 चे व्हिडिओही शेअर केले जात आहेत. खरं तर, चांद्रयान-3 मिशन अंतर्गत, त्याचे रोबोटिक उपकरण 24 ऑगस्टपर्यंत चंद्राच्या भागावर उतरविले जाईल. येथे आतापर्यंत कोणत्याही देशाची मोहीम पोहोचलेली नाही. त्यामुळे संपूर्ण जगाच्या नजरा भारताच्या या मोहिमेकडे लागल्या आहेत.
Chandrayaan 3 Reaction: चांद्रयान-३ चे प्रक्षेपण श्रीहरिकोटा येथून करण्यात आले आहे. भारतासोबतच संपूर्ण जगाचे डोळे या मोहिमेकडे लागले आहेत. चांद्रयान-३ च्या प्रक्षेपणावर सोशल मीडियावरही प्रतिक्रियांचा पाऊस पडू लागला आहे. चांदोबा, आम्ही येतोय..अशा प्रतिक्रिया सोशल मीडियात येऊ लागल्या आहेत. यासोबतच चांद्रयान-2 चे व्हिडिओही शेअर केले जात आहेत. खरं तर, चांद्रयान-3 मिशन अंतर्गत, त्याचे रोबोटिक उपकरण 24 ऑगस्टपर्यंत चंद्राच्या भागावर उतरविले जाईल. येथे आतापर्यंत कोणत्याही देशाची मोहीम पोहोचलेली नाही. त्यामुळे संपूर्ण जगाच्या नजरा भारताच्या या मोहिमेकडे लागल्या आहेत.
सोशल मीडियावर छाया चांद्रयान-३ ची चर्चा
शेकडो यूजर्सनी ट्विटर आणि इतर सोशल मीडियावर छान प्रतिक्रिया दिली आहे. "चंदो मामा, आम्ही येत आहोत." , असे अनेकांनी लिहिले आहे.
तर शेकडो वापरकर्त्यांनी चांद्रयानचा जुना व्हिडिओ देखील शेअर केला आहे. एका यूजरने लिहिले की, 'हे काही जादूपेक्षा कमी नाही.' अनेक युजर्सनी लव्ह यू इंडियासह चांद्रयान-३ चा व्हिडिओ पोस्ट केला आहे. एका यूजरने इस्रोचे माजी प्रमुख के सिवन यांचा फोटोही शेअर केला आहे.
चांद्रयान-3 च्या कक्षेत यशस्वी प्रक्षेपणानंतर इस्रोनेही आनंदोत्सव साजरा केला. त्याचे व्हिडिओही सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहेत. एका यूजर्सने लिहिले, "#Chandrayaan3 यशस्वीरित्या प्रक्षेपण पाहून आनंद झाला. हे केवळ चंद्रावरच्या ऐतिहासिक प्रवासाचे प्रक्षेपण नाही, तर नवीन, स्वावलंबी भारतासाठी अब्जावधी आकांक्षांचे प्रक्षेपण आहे." असेही यूजर्स म्हणत आहेत.
चांद्रयान 2 ला आलेल्या अपयशानंतर अखेर तब्बल 4 वर्षांनी इस्त्रोनं शास्त्रज्ञांच्या प्रचंड मेहनतीच्या बळावर चांद्रयान 3 मोहिम हाती घेतली. अनेक महिन्यांची मेहनत आणि आव्हानं पेलत इस्त्रोच्या चांद्रयान 3 उड्डाणाचा दिवस उजाडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून जागतिक स्तरावरील अनेक विद्वान आणि अभ्यासकांनी या मोहिमेवर लक्ष केंद्रीत करत असतानाच अखेर शुक्रवार 14 जुलै 2023 ला Chandrayaan 3 भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 2 वाजून 35 मिनिटांनी अवकाशात झेपावलं आणि या यानासह भारताच्या असंख्य महत्त्वाकांक्षाही झेपावल्या.
काय आहेत चांद्रयान 3 ची वैशिष्ट्ये?
चांद्रयानाच्या 26 तासांपूर्वीच त्याच्या उड्डाणासाठीचं Count Down सुरु करण्यात आलं. श्रीहरीकोटाच्या सतीश धवन अवकाश केंद्रावरुन हे प्रक्षेपण पार पडलं. चांद्रयान 3 ची लाँचिंगची तयारी पूर्ण होताच या तयारीचा आढावा घेण्यासाठी भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोची रंगीत तालीमही पूर्ण झालीय आणि रंगीत तालीम 100 टक्के यशस्वी ठरली होती.
हे चांद्रयान देशातल्या कोट्यवधी लोकांची आशा बनून निधड्या छातीनं श्रीहरीकोटात उभं होतं. त्याच्या लॉन्चिंगसाठी LVM-3-M4 रॉकेटचा वापर करण्यात आला.
प्रवासाचं सांगावं तर, सुमारे 3 लाख 84 हजार किलोमीटरचा प्रवास करुन चांद्रयान-3 हे 23 किंवा 24 ऑगस्टला चंद्रावर उतरणार आहे.
चांद्रयान-3 मोहिम भारतासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. चांद्रयान चंद्रावर उतरेल तेव्हा अमेरिका, रशिया आणि चीननंतर ही किमया करणारा भारत जगातला चौथा देश ठरणार आहे.