Chandrayaan-3 Data: चंद्रावरील खड्ड्यांमध्ये पाणी कुठून आले?  जगातील सर्वात मोठे रहस्य उलगडणार आहे. भारताच्या चांद्रयान 3 ने गोळा केलेला डेटा याबाबतची माहिती देणार आहे. चांद्रयान 3 मोहिमे दरम्यान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर बर्फाच्या रुपात पाण्याचे साठे आहेत. 


चांद्रयान 3 मोहिमेत अत्यंत महत्त्वाची माहिती हाती लागली


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

14 जुलै 2023 रोजी भारताचे चांद्रयान 3 चंद्राकडे झेपावले. श्रीहरिकोटामधल्या स्पेस सेंटरमधून  2 वाजून 35 मिनिटांनी चांद्रयान 3 चंद्राकडे झेपावलं. LVM 3 या लाँच व्हेईकलमधून चांद्रयानाचं प्रक्षेपण करण्यात आले. यानंतर 23 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6 वाजून 4 मिनिटांनी चांद्रयान-3 ने  चंद्रावर सॉफ्ट लँडिंग केले. चांद्रयान 3 चा विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हरने चंद्राच्या पृष्ठभागावर फिरत संशोधन केले. चंद्रावरील तापमान, हवामान, चंद्रावर होणारे भूकंप तसेच ऑक्सिजन, आर्यन तसेच इतर खनिजे या संदर्भातील भरपूर डेटा विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हरने  गोळा केला आहे. 


चंद्रावर गोठलेल्या रुपात पाणी


चंद्राच्या पृष्ठभागावर गोठलेल्या रुपात पाण्याचे साठे आहेत.  चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर बर्फाप्रमाणे काही भाग आढळला आहे. तसेच चंद्राच्या पृष्ठभागावर असलेल्या खड्ड्यांमध्ये देखील अशा प्रकारे बर्फाचे नमुने आढळले आहेत. धूमकेतू किंवा लघुग्रहांची टक्कर तसेच ज्वालामुखीमुळे चंद्रावर पाण्याचे साठे तयार झाले असावेत असा संशोधकांचा अंदाज होता. मात्र,  चांद्रयान 3 ने गोळा केलेल्या डेटाचे निरीक्षण आणि विश्लेषण करुन चंद्रावर पाण्याचे साठे कसे तयार झाले याचे रहस्य उलगडण्यात मदत होईल असा कोलोरॅडो बोल्डर विद्यापीठातील खगोल भौतिकशास्त्र आणि ग्रहशास्त्राचे सहाय्यक प्राध्यापक पॉल हेन म्हणाले.


चांद्रयान 3 ने गोळा केला अत्यंत महत्वाचा डेटा


चांद्रयान 3 चा प्रज्ञान रोव्हर चंद्राच्या पृष्ठभागावर भ्रमण करत असताना संशोधना दरम्यान चंद्राच्या पृष्ठभागावर सल्फर (S ) असल्याची पृष्टी झाली होती. प्रज्ञान रोव्हरवर असलेल्या लेझर-प्रेरित ब्रेकडाऊन स्पेक्ट्रोस्कोप (LIBS) अर्थात साधन मोजमाप पेलोडच्या मदतीने चंद्राच्या पृष्ठभागावर विविध खनिजांचा शोध घेण्यात आला. दक्षिण ध्रुवाजवळील चंद्राच्या पृष्ठभागावर सल्फर (एस) च्या असल्याची पुष्टी रोव्हरने केली होती. चांद्रान 3 मोहिमेतील हे सर्वात मोठे यश आहे. लेझरच्या मदतीने चंद्रावरील खडक तसेच मातीमध्ये ब्लास्ट करुन त्याचे परिक्षण करण्यात आले. चंद्राच्या पृष्ठभागावर अॅल्युमिनियम (Al), सल्फर (S), कॅल्शियम (Ca), लोह (Fe), क्रोमियम (Cr) आणि टायटॅनियम (Ti) ची उपस्थिती उलगडली आहे. पुढील मोजमापांनी मॅंगनीज (Mn), सिलिकॉन (Si) आणि ऑक्सिजन (O) असल्याचे पुरावे या संशोधनातून मिळाले आहेत. हायड्रोजनच्या अस्तित्वाबाबत अजून कोणतीही अपडेट समोर आली नाही. चांद्रयान-3 च्या विक्रम लँडरने चंद्राच्या दक्षिण ध्रुवाभोवतीच्या मातीचं तापमान प्रोफाइलिंग करत तापमानाचे देखील विश्ले।ण केले होते.  चंद्राच्या पृष्ठभागावर तापमान सुमारे 50 अंश सेल्सिअस आहे. मात्र, जसं पृष्ठभागापासून खोलवर जातो तसा तापमानात बदल होतो. चंद्राच्या पृष्ठभागाच्या 8 सेंटीमीटर खोलीवर तापमान उणे 10 अंश सेल्सिअस असल्याचे निरीक्षण नोंदवण्यात आले होते.