Chandrayaan-3: चांद्रयान-3 ने 23 ऑगस्ट 2023 रोजी चंद्रावर सॉफ्ट लँडिग करत इतिहास रचला आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँडिग करणारा भारत हा पहिला देश ठरला आहे. विक्रम लँडरने चंद्रावर पाऊल ठेवताच देशभरात उत्साहाची लाट उसळली. इस्रोच्या शास्त्रज्ञांचेही अभिनंदन करण्यात आले. अशातच अनेकांच्या स्टेटस व फेसबुक पोस्टवर भारताचे चांद्रयान-3 मोहिमेच्या पोस्ट टाकल्या आहेत. त्यातीलच एक फोटो सध्या व्हायरल होत आहे. यात चंद्राच्या पृष्ठभागावर भारताच्या अशोकस्तभांचे निशाण उमटल्याचे दिसत आहे. त्यामुळं हा फोटो विक्रम लँडरने काढला असल्याचंही बोललं जात आहे. मात्र, या फोटोमागचे सत्य काही वेगळेच आहे. (Chandrayaan-3 Photo)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

23 ऑगस्ट रोजी चांद्रयान-3 चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँड झाले. 40 दिवसांनंतर विक्रम लँडरने 6 वाजून 4 मिनिटांनी चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिग केली. त्यानंतर दोन तास 26 मिनिटांनी विक्रम लँडरमधून प्रज्ञान रोव्हर चंद्रावर उतरला. प्रज्ञान रोव्हर हा सहा चाकं असलेला एक रोबोट आहे. सोशल मीडियावर याच प्रज्ञान रोव्हरबाबत एक दावा करण्यात आला आहे. लोकांनी म्हटलं आहे की, चंद्रावर रोव्हर भ्रमण करत असताना मागे अशोक स्तंभ आणि इस्रोचे निशाण उमटवत आहेत. 


सोशल मीडियावर व्हायरल होत असतेला या दाव्यात काही एक तथ्य नाहीये. तसंच तो फोटोदेखील इस्रोकडून शेअर करण्यात आलेला नाहीये. चंद्राच्या पृष्ठभागाचा असा कोणताही फोटो इस्रोने शेअर केला नाहीये. सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा फोटो एक कम्यूटर इमेज आहे. ग्राफिक्सच्या माध्यमातून तो फोटो बनवण्यात आला आहे. तसंच, आणखी एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर यांना एकत्रित दाखवलं गेलं आहे. मात्र, हा फोटोदेखील खरा नसून प्रतिकात्मक पद्धतीने बनवण्यात आला आहे. 


चंद्रावर उमटणार अशोकस्तंभाच्या खुणा


दरम्यान, प्रज्ञान रोव्हरच्या चाकांवर अशोकस्तंभांची छाप तयार करण्यात आली आहे. जस जसे प्रग्यान रोव्हर चंद्रावर भ्रमण करेल तशी या चिन्हांची छाप चंद्रावर उमटणार आहे. प्रज्ञान रोव्हरचं मिशन लाइफ 1 लूनार डे इतकं आहे. चंद्रावरील 14 दिवस हे पृथ्वीवरील एक दिवस आहे. 


मेड फॉर मून 


विक्रम लँडरमागोमागच आता त्यानं सोबत नेलेला प्रज्ञान रोवरही चंद्रावर उतरला आहे. मेड इन इंडिया, मेड फॉर मून', असं म्हणत इस्रोनं रोवर चंद्रावर उतरल्याचं सांगितलं इतकंच नव्हे तर त्यानं चंद्रावर भ्रमणही सुरु केल्याचं स्पष्ट केलं.