भारताच्या चांद्रयान 3 (Chandryaaan 3) ने बुधवारी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरील (South Pole) पृष्ठभागावर लँडिंग करत इतिहास रचला आहे. दरम्यान, भारताने चंद्रावर पाऊल ठेवताच अशी कामगिरी करणारा अमेरिका, रशिया आणि चीननंतर चौथा देश ठरला आहे. तसंच दक्षिणी ध्रुवावर जाणारा पहिलाच देश आहे. याआधी कोणत्याही देशाला दक्षिण ध्रुवावर उतरणं जमलेलं नाही. दरम्यान, इस्रोचे प्रमुख एस सोमनाथ यांनी चांद्रयान 3 चं लँडर विक्रम आणि रोव्हर प्रज्ञान सध्या व्यवस्थित काम करत आहेत अशी माहिती दिली आहे. यावेळी त्यांनी चांद्रयान 3 समोर आगामी काळात उभ्या राहणाऱ्या आव्हानांचाही उल्लेख केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इस्रो प्रमुखांनी पीटीआयशी बोलताना सांगितलं की, "चांद्रयान 3 चं लँडर विक्रम आणि रोव्हर प्रज्ञान दोन्ही अत्यंत चांगल्या स्थितीत आहेत. दोन्हीही व्यवस्थित काम करत आहेत. यापुढेही अनेक हालचाली होणार आहेत. पण चंद्रावर वातावरण नसल्याने कोणतीही वस्तू चांद्रयान 3 ला धडकू शकते. याशिवाय थर्मल आणि कम्युनिकेशन ब्लॅकआऊट अशा समस्या निर्माण होऊ शकतात".


"...तर लँडर आणि रोव्हर नष्ट होईल" 


इस्रो प्रमुख एस सोमनाथ यांनी सांगितलं आहे की, "जर एखादा लघुग्रह किंवा इतर कोणतीही वस्तू चांद्रयान-3 ला खूप वेगाने आदळली तर लँडर आणि रोव्हर दोन्ही नष्ट होतील. जर चंद्राच्या पृष्ठभागाकडे बारकाईने पाहिलं तर, तो अवकाशातील वस्तूंच्या खुणांनी भरलेला आहे. पृथ्वीवरही दर तासाला लाखो अंतराळातील वस्तू येतात, पण आपलं वातावरण त्यांना अनुकूल नसल्याने त्या टिकत नाहीत". 


‘हो, खरंच ‘या’ ग्रहावर एलियन्स आहेत!’ NASA च्या शास्त्रज्ञाचा जाहीर खुलासा



चांद्रयान 3 च्या सॉफ्ट लँडिगवर बोलताना त्यांनी सांगितलं की "फक्त इस्रो नाही तर संपूर्ण देशासाठी ही अभिमानाची बाब आहे. आपली लँडिग यशस्वी झाली याचा इतर भारतीयांप्रमाणे आम्हाला गर्व आहे. आम्ही इतकी वर्षं जी मेहनत घेतली त्याचा हा परिणाम आहे. आगामी काळात आम्ही अजून आव्हानात्मक मोहिमा करण्यासाठी तयार आहोत". 


 


पुढील महिन्यात भारताची पहिली सौरमोहिम 


चांद्रयान 3 च्या यशस्वी मोहिमेनंतर इस्रो 2 सप्टेंबर 2023 रोजी आपल्या सौर मोहिमेला लाँच करणार आहे. इस्रोच्या या मोहिमेचं नाव आदित्य-एल-1 (Aditya-L1) आहे. श्रीहरीकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटरमधून ही मोहिम लाँच होईल. 



इस्रोच्या स्पेस अॅप्लिकेशन सेंटरचे संचालक नीलेश एम. देसाई यांनी दिलेल्या माहितीनुसार, आदित्य एल-1 पीएसएलव्ही रॉकेटमधून प्रक्षेपित केले जाईल. आदित्य-एल1 15 लाख किलोमीटरचे अंतर 127 दिवसांत पूर्ण करेल. हे सूर्य आणि पृथ्वीच्या दरम्यान पॉइंट हॅलो कक्षामध्ये तैनात केलं जाईल. या ठिकाणाहून तो सूर्याचा अभ्यास करेल.


आतापर्यंत 22 सौर मोहिमा


अमेरिका, जर्मनी आणि युरोपिअन अंतराळ संस्थेने आतापर्यंत सूर्यावर 22 मोहिमा केल्या आहेत. यामधील एक मोहीम अपयशी ठरली आहे. ज्यामधील एक अपयशी ठरलं असून, एकाला थोडंसं यश मिळालं होतं. 22 पैकी सर्वाधिक मोहिमा NASA ने आखलेल्या आहेत.  


NASA ने 1960 मध्ये पहिली सूर्य मोहीम पायोनियर-5 पाठवली होती. जर्मनीने 1974 मध्ये नासाच्या मदतीने पहिली सूर्य मोहीम पाठवली. युरोपियन स्पेस एजन्सीने 1994 मध्ये नासाच्या सहकार्याने आपले पहिले मिशन पाठवले होते.