Chandrayaan 3 Latest update : इस्रोकडून 14 जुलै रोजी भारतातर्फे चांद्रयान 3 अवकाशात पाठवण्यात आलं. चंद्रावरील पाणीसाठा आणि तिथं येणारा भूकंप या आणि अशा अनेक प्रश्नांच्या उत्तरांचा शोध घेण्याच्या हेतूनं भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनं ही मोहिम हाती घेतली. पाहता पाहता पहिल्या क्षणापासून या मोहिमेत एक एक टप्पा यशस्वीरित्या सर झाला आणि आता चांद्रयान 3 चंद्राच्या आणखी जवळ पोहोचलं आहे. 14 ऑगस्ट रोजी इस्रोनं चांद्रयानाची कक्षा आणखी कमी केली असून, आता या यानाचा कठीण आणि आव्हानात्मक प्रवास सुरु झाल्याची माहिती दिली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चांद्रयानानं चंद्राभोवती अंडाकृती कक्षेतील परिक्रमण पूर्ण केलं असून, आता त्याच्या वर्तुळाकार कक्षेतील परिक्रमणास सुरुवात झाल्याची माहिती इस्रोकडून देण्यात आली. इस्रोकडून अगदी योग्य maneuvre पार पाडल्यानंतर आता चांद्रयान 3 चंद्रापासून 150 km x  177 km अंतरावर असल्याचं सांगण्यात येत आहे. यापुढील टप्पा 16 ऑगस्टला असल्याची माहितीसुद्धा अंतराळ संस्थेनं दिली आहे. 



सध्या चांद्रयान कुठंय? चंद्रावर ते केव्हा पोहोचणार? 


भारतानं पाठवलेलं Chandrayaan-3 ऑगस्ट महिन्याच्या 23 तारखेला चंद्राच्या पृष्ठावर पोहोचेल. जवळपास 40 दिवसांच्या प्रवासानंतर हे चांद्रयान चंद्र गाठणार आहे. आतापर्यंत या चांद्रयानानं नेमका कसा प्रवास केला आहे आणि इथून पुढं प्रवास कसा असणार आहे, हे पाहून घ्या. 


Chandrayaan-3 mission चा प्रवास...


14 जुलै- LVM3 M4 च्या माध्यमातून चांद्रयान 3 अवकाशात झेपावलं. 
15 जुलै - ज्यानंतर पहिल्यांदा चांद्रयानाची कक्षा वाढवण्यात आली. जिथं पहिली फायरिंग पार पडली. यावेळी चांद्रयान  41762 किमी x 173 किमी अंतरावर पोहोचलं. 
17 जुलै - चांद्रयानाची कक्षा दुसऱ्यांदा वाढवण्यात आली. ज्यावेळी त्याचं अंतर  41603 किमी x 226 किमी इतकं होतं. 
22 जुलै - आणखी एकदा चांद्रयानाची कक्षा इस्रोनं वाढवली. यावेळी पृथ्वीपासूनचं त्याचं अंतर होतं 71351 किमी x 233 किमी. त्यामागोमाग 25 जुलै रोजीसुद्धा चांद्रयानाची कक्षा वाढवली गेली. 


हेसुद्धा वाचा : Aditya L1 Launch : चंद्रामागोमाग सूर्यावरही इस्रोची नजर; Photo सह पाहा नव्या मोहिमेची तयारी कुठवर आली...  


1 ऑगस्ट- हा दिवस चांद्रयान मोहिमेतील महत्त्वाचा टप्पा ठरला. कारण, इथं त्यानं ट्रान्सल्युसर ऑर्बिटमध्ये प्रवेश केला होता. 
5 ऑगस्ट- इथं चांद्रयानानं चंद्राच्या कक्षेत प्रवेश केला. यावेळी चंद्रापासूनचं त्याचं अंतर 164 किमी x 18074 किमी इतकं होतं. 
6 ऑगस्ट - यावेळी चांद्रयान 3 ची कक्षा पुन्हा कमी करण्यात आली. जेव्हा चंद्रापासूनचं त्याचं अंतर 170 किमी x 4,313 किमी इतकं होतं. 
9 ऑगस्ट- पुढचा टप्पा आणखी खास ठरला कारण, Chandrayaan-3 चं चंद्रापासूनचं अंतर आणखी कमी झालं.