Chandrayaan 3 Moon Landing: चंद्रावर चांद्रयान पोहोचण्यासाठी आता अवघे काही तास शिल्लक राहिलेले असतानाच रशियाला मात्र मोठा धक्का बसला. कारम,  मिशन LUNA-25 चंद्रावर आदळून ते उध्वस्त झालं. 21 ऑगस्ट रोजी रशियाचं हे यान चंद्रावर पोहोचणं अपेक्षित होतं. पण, तसं होऊ शकलं नाही. त्यामुळं आता भारताच्या चांद्रयानाकडून अनेकांच्याच अपेक्षा वाढल्या आहेत. सध्या हे चांद्रयान चंद्रापासून अवघ्या 25 किमी अंतरावर घिरट्या घालत असून 23 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6 वाजून 4 मिनिटांनी ते चंद्राच्या पृष्ठावर Soft Landing चा प्रयत्न करेल. पण, असं न झाल्यास काय? चांद्रयान लँड होणार तरी कसं? याबद्दलची प्रक्रिया एकदा व्यवस्थित समजून घ्या. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चांद्रयानाच्या प्रोपल्शनपासून वेगळं झाल्यानंतर आता लँडर मॉड्यूल विक्रम स्वत:हूनच चंद्राच्या दिशेनं पुढे जात आहे. सध्याच्या घडीला तो चंद्रापासून 25 किमी अंतरावर असून, लँडिंगपूर्वी तो एका अंतर्गत चाचणी प्रक्रियेतून पुढं येईल. ज्यानंतर त्यातून रोवर प्रज्ञान चंद्रावर दाखल होईल. दरम्यान, याआधी लँडर चंद्रावर साधारण 5 वाजून 47 मिनिटांनी दाखल होईल अशी शक्यता इस्रोनं वर्तवली होती. पण, मात्र X च्या माध्यमातून माहिती देताना मॉड्युल चाचणी प्रक्रियेतून जाणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. 



 


एका प्रतिष्ठित वृत्तमाध्यमाच्या माहितीनुसार 23 ऑगस्टपासून चंद्रावर 'लुनार डे'ची सुरुवात होईल. पृथ्वीशी त्याची तुलना करायची झाल्यास चंद्रावर एत लूनार दिवस हा पृथ्वीच्या 14 दिवसांइतका असतो. म्हणजेच हे 14 दिवस चंद्रावर सतत सूर्यप्रकाश असतो. चांद्रयानात असणारी यंत्रणा ही एक लूनार दिवस चालणारी आहे. इथं यानातील उपकरणांना सौरउर्जेची गरज भासते. परिणामी जर 23 ऑगस्टला चांद्रयानानं चंद्राचा पृष्ठ गाठला नाही, तर तो इथं दुसऱ्या दिवशी पुन्हा प्रयत्न करेल. पण, तिथंही तो अपयशी ठरला तर त्याला 29 दिवस म्हणजेच एस लुनार दिवस आणि रात्र म्हणजे जवळपास संपूर्ण महिन्याभराची प्रतीक्षा करावी लागेल.  


चांद्रयानात बरंच इंधन शिल्लक.... 


चांद्रयान चंद्राभोवती प्रदक्षिणा घालत असताना पाच वेळा त्याचं इंजिन चालू करण्यात आलं होतं. त्यावेळी एकूण 1546 किलो इंधनापैकी साधारण 753 किलो इंधन वापरलं गेलं. म्हणजेच आता चांद्रयानाच इतकं इंधन शिल्लक आहे की ते अनेक वर्षे कार्यरत राहू शकेल. 


इस्रो प्रमुखं एस. सोमनाथ यांनी दिलेल्या माहितीनुसार लँडिंग प्रक्रियेत घोळ झाला तरीही प्रोपल्शन मॉड्युल मात्र बरीच वर्षे काम करत राहील असंही ते म्हणाले. चांद्रयान 2 चं ऑर्बिटर अद्यापही काम करत असल्यामुलं चांद्रयान 3 चं प्रोपल्शन मॉड्युल नेमकं किती वर्षे सक्रिय राहील याचा अंदाज तुम्ही लावूच शकता.