कानपूर : UP tractor-trolley accident: Death toll rises to 26, investigation underway : उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये भाविकांनी भरलेल्या ट्रॅक्टरचा अपघातात झाला आहे. या अपघातात 26 भाविकांचा जागीच मृत्यू झाला असून 28 जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी  काहींची प्रकृती चिंताजनक आहे. त्यामुळे मृतांचा अकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 नवरातीरानिमित्त उन्नाव येथील चंद्रिका देवीच्या मंदिरातून ( Chandrika Devi temple in Fatehpur) दर्शन घेऊन हे सर्वजण कोरथा गावात परतत असताना ट्रॅक्टर ट्रॉली पाण्याने भरलेल्या शेतात पडली. त्यामुळे ट्रॅक्टरमध्ये अडकलेल्या लोकांचा गुदमरून मृत्यू झाला. सरकारने मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी दोन लाख रुपये आणि जखमींना 50 हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. 



उत्तर प्रदेशातील कानपूर जिल्ह्यातील एका गावाजवळ शनिवारी ट्रॅक्टर-ट्रॉली उलटून तलावात पडल्याने 26 जणांचा मृत्यू झाला आणि अनेक गंभीर जखमी झाले, असे जिल्हा दंडाधिकारी विशाक जी अय्यर यांनी सांगितले. मृतांत अनेक जण या महिला आणि मुले आहेत. सार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भादेउना गावाजवळ संध्याकाळी ही घटना घडली, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. 



 पीटीआयशी बोलताना अय्यर यांनी सांगितले की मृतांची संख्या 26 वर गेली आहे. फतेहपूरच्या चंद्रिका देवी मंदिरात प्रवाशांनी "मुंडन" सोहळ्याला हजेरी लावल्यानंतर सुमारे 50 लोकांना घेऊन ट्रॅक्टर-ट्रॉली घाटमपूरकडे निघाली होती.