मुंबई : नोकरदारवर्गाच्या पगारासंदर्भात एक महत्वाची बातमी समोर येतेय. एप्रिल महिन्यापासून कर्मचाऱ्यांच्या हातात कमी पगार येणार आहे. नवीन कामगार विधेयकांत बदल झाल्यामुळे असे घडणार आहे. या बदलानुसार सरकार कामाचे तास, पीएफचे नियम बदलण्यात आले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

येणाऱ्या काळात ग्रॅज्यूएटी, पीएफ, कामाच्या तासांमध्ये मोठा बदल पहायला मिळू शकतो. यामुळे कर्मचाऱ्यांच्या ग्रॅज्यूएटी आणि पीएफमध्ये वाढ होणार असल्याचे सांगितलं जातंय. मात्र हातात येणारा पैसा म्हणजे टेक होम सॅलरी कमी होणार आहे ही कर्मचाऱ्यांसाठी काळजीची बातमी आहे. 



ग्रॅज्यूएटी आणि पीएफमध्ये वाढ झाल्याने रिटायरमेंटनंतर मिळणाऱ्या पैशांमध्ये देखील वाढ होणार आहे. कंपन्यांच्या बॅलन्स शीटवर देखील याचा परिणाम दिसून येणार आहे.


गेल्या वर्षी संसदेत पारित केले गेलेले तीन कामगार विधेयकं 1 एप्रिलपासून लागू होण्याची शक्यता आहे. वेतनाच्या नव्या परिभाषेनुसार, भत्ते एकूण सॅलरीच्या जास्तीत जास्त 50 टक्के असतील.