मुंबई : मागील 1 वर्षात आयपीओ मार्केटमध्ये मोठ्याप्रमाणात उलाढाल होताना दिसत आहे. या वर्षीदेखील 30 हून अधिक कंपन्यांनी आपला आयपीओ आणला आहे. पुढे देखील अनेक कंपन्या शेअर मार्केटमध्ये लिस्ट होण्यासाठी रांगेत आहेत. मागील एका वर्षात अनेक आयपीओने गुंतवणूकदारांना शानदार रिटर्न दिले आहेत.परंतु अधिक सब्सक्रिप्शनमुळे रिटेल गुंतवणूकदारांच्या हाती काहीही लागलेले नाही. अशातच सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सेबी (SEBI)रिटेल गुंतवणूकदारांच्या कोट्याच्या नियमांमध्ये काही बदल करण्यावर काम करीत आहे. आयपीओ प्राइस बॅंडबाबत सेबीचा नक्की प्लॅन काय? याबाबत सेबीचे चेअरमन अजय त्यागी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रिटेल गुंतवणूकदारांचा वाढला कोटा
मार्केटमध्ये 2 लाखाहून कमी बोली लावणाऱ्या गुंतवणूकदारांना रिटेल गुंतवणूकदार असे म्हणतात. कोटा वाढवण्यापेक्षा रिटेल गुंतवणूकदारांनी सेकंडरी मार्केटकडेही पाहिलं पाहिजे. तेथे ट्रॅक रेकॉर्ड करणे सोपे असते. असे त्यागी यांनी म्हटले आहे.


आयपीओ मार्केटमध्ये किती कोटा
मार्केट  रेग्युलेटर सेबीच्या नियमांनुसार जर कोणती नफ्यात असलेली कंपनी आयपीओ आणत असेल तर त्यामध्ये रिटेल गुंतवणूकदरांसाठी 35 टक्क्यांपर्यंत कोटा आरक्षित असायला हवा. परंतु जर कंपनी तोट्यात असेल तर आयपीओ साइजच्या 10 टक्के कोटा रिटेल गुंतवणूकदारांसाठी आरक्षित असू शकेल.


आयपीओ प्राइस बँडवर प्लॅन
सेबीने आयपीओ प्राइस बँडच्या नियमांवर काम सुरू केले आहे. आयपीओच्या नियमांमध्ये विशेषतः प्राइस बँडशी संबधित नियमावलीत सुधारणा करण्याचे नियोजन आहे. नुकतेच आलेल्या काही कंपन्यांनी आयपीओच्या प्राइस बॅंडमध्ये 1-1 रुपये एवढेच अंतर ठेवले होते. सेबी याबाबत कठोर होणार आहे. सेबीने मर्चंट्स  बँकर्सला याबाबत पत्र लिहले आहे. असे त्यागी यांनी  म्हटले आहे.