भारताचा माजी कर्णधार विराट कोहली (virat kohli) ऑस्ट्रेलियात (australia) सुरू असलेल्या आयसीसी टी-20 विश्वचषक 2022 मध्ये (ICC T20 World Cup) उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. कोहलीने 3 सामन्यात 144.44 च्या स्ट्राईक रेटने 156 धावा केल्या आहेत. 2022 च्या टी-20 विश्वचषकात (t20 world cup 2022) सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तो तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याचा फॉर्म परत आल्याने भारतीय क्रीडा चाहत्यांना खूप आनंद झाला आहे. (Chanting Virat kholi name will end unemployment Ex judge markandey katju of Supreme Court ridiculed)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

क्रिकेटच्या कॉरिडॉरपासून ते सोशल मीडियापर्यंत (Social Media) कोहलीच्या नावाची चर्चा आहे. सर्वोच्च न्यायालयाचे (supreme court) माजी न्यायमूर्ती मार्कंडेय काटजू (markandey katju) यांनीही आपल्या ट्विटमध्ये कोहलीचा उल्लेख केला आहे. मात्र, या बहाण्याने त्यांनी टोमणा मारत महागाई, बेरोजगारी असेही मुद्देही उपस्थित केले आहेत. मार्कंडेय काटजू (markandey katju) नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असतात. आता विराटचा उल्लेख केल्याने त्यांचे हे ट्विट (Tweet) सध्या व्हायरल होत आहे.


"विराट कोहली, विराट कोहली, विराट कोहली. भारतीयांनो हा मंत्र जपत राहा आणि तुमची बेरोजगारी, महागाई, उपासमार, आरोग्य सेवेचा अभाव आणि चांगले शिक्षण या सर्व समस्या पूर्णपणे नष्ट होतील. या मुद्द्यांवरुन लक्ष्य वळवण्याची ही एक उत्तम रणनीती आहे. रोमन सम्राट नेहमी म्हणत की जर तुम्ही लोकांना भाकरी देऊ शकत नसाल तर त्यांना सर्कस दाखवा," अशी टीका मार्कंडेय काटजू (markandey katju) यांनी केली आहे.



@LokeshVirat18K ने 29 ऑक्टोबर 2022 रोजी विराट कोहलीच्या फोटोसह ट्विटरवर एक पोस्ट शेअर केली होती. त्यात इतिहास साक्षी आहे, भारत-पाकिस्तानचा सामना जेव्हाही होतो तेव्हा समोर विराट नावाचे वादळ उभे असते, असे म्हटले होते. विराट कोहलीचे कौतुक करणाऱ्या अशा अनेक पोस्टला उत्तर देताना न्यायमूर्ती मार्कंडेय काटजू यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. एवढेच नाही तर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात विराट कोहली मोठी धावसंख्या करू शकल्यानंतरही त्यांनी हेच ट्विट केले होते.



दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाचे (supreme court) माजी न्यायाधीश मार्कंडेय काटजू (markandey katju) सोशल मीडियावर आपल्या स्पष्ट मतासाठी प्रसिद्ध आहेत. 2020 मध्ये, त्यांनी पत्रकार अरफा खानम शेरवानी यांना फटकारले होते. अरफा जेएनयूची माजी विद्यार्थिनी शेहला रशीदला शरिया, बुरखा, मदरसा आणि मौलानासारख्या मुस्लिमांना मागे ठेवणाऱ्या मुद्द्यांवर प्रश्न का विचारत नाही? असा सवाल त्यांनी केला होता.