रायपूर : महिला मजूरांना बाळाच्या जन्मानंतर दहा हजार रुपये प्रसूती मदत देण्याची योजना छत्तीसगड सरकारने जाहीर केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, छत्तीसगड असंगठीत कर्मकार राज्य सामाजिक सुरक्षा मंडळाद्वारे राज्यातील ठेका मजूर. घरगुती महिला कामगार आणि हमाल महिला यांना प्रसूती सहाय्यता योजनेअंतर्गत बाळाच्या जन्मानंतर १० हजार रुपयांची मदत केली जाईल. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यातील श्रम मंत्री भईया लाल राजवाडे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केलेल्या छत्तीसगड असंगठीत कर्मकार राज्य सामाजिक सुरक्षा मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. 


या योजनेअंतर्गत मंडळातील अधिकृत महिला मजूरांना बाळाच्या जन्मानंतर ९० दिवसात ही मदत मिळेल. यापूर्वी या योजनेअंतर्गत गरोदरपणाच्या पहिल्या तीन महिन्यात  पाच हजार रुपये आणि आठव्या महिन्यात पाच हजार रुपये मदत दिली जात होती. मात्र आता ही रक्कम एकत्रितपणे मिळणार आहे. ही मदत फक्त दोन प्रसूतीपर्यंत मर्यादीत राहील.