सुकमा : छत्तीसगडच्या सुकमा येथे सुरक्षा जवानांनी नक्षल्यांनी मोठा हल्ला केला. २०२० सालचा आतापर्यंतचा हा सर्वात मोठा हल्ला आहे. दुपारी सुकमाच्या चिंतागुफा पोलीस ठाणे क्षेत्रातील कसालपाड आणि मिनपाच्या भागात जवानांवर हल्ला झाला. जवान परतत असताना हा हल्ला झाला. यामध्ये १४ जवान जखमी झाले. यामधील दोघांची स्थिती गंभीर आहे. तर यामध्ये ५ नक्षली ठार झाल्याचेही वृत्त आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


जखमी जवानांना रायपूर येथे एअरलिफ्ट करण्यात आले आहे. नक्षल्यांचा म्होरक्या हिडमाच्या कॅम्पबद्दल जवानांना माहिती मिळाली होती. यानंतर जवानांनी सर्च ऑपरेशन सुरु केले होते. तिथून परतत असताना हा हल्ला झाला. तर १३ जवान संपर्कात नसल्याचेही समोर आले आहे.