Cheapest Flight Ticket: आयुष्यात एकदा तरी विमान प्रवास करावा, आकाशात उड्डाण घ्यावं अशी प्रत्येकाची इच्छा असते. पण विमानाचं तिकीट इतकं महाग असतं की अनेक सर्वसामान्यांसाठी हे स्वप्न अपूर्ण राहतं. त्यामुळे केवळ धनवानच विमान प्रवास करतात असा समजलं जातं.  पण तुम्ही अवघ्या 150 रुपयांमध्ये हवाई प्रवास करु शकता, असं कोणी सांगितलं तर? विश्वास बसेल का?  पण हे खरे आहे. अशा हवाई मार्गांबद्दल जाणून घेऊया ज्यात केवळ 150 रुपयात आपले स्वप्न पूर्ण करु शकता. 


दोन शहरांमधला विमान प्रवास फक्त 150 रुपयांत


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आसाममधील लीला बारी ते तेजपूरपर्यंत विमानाने प्रवास करण्यासाठी तुम्हाला तुमच्या खिशातून फक्त 150 रुपये द्यावे लागतील. या दोन शहरांमधला विमान प्रवास अवघ्या 50 मिनिटांत पूर्ण होऊ शकतो. यामुळे तुमच्या खिशाला जास्त चाप बसणार नाही. केवळ या मार्गावरच नव्हे तर अशी अनेक उड्डाणे आहेत जिथे तिकीटाचे मूळ भाडे 1,000 रुपयांपेक्षा कमी आहे. 1 हजार रुपये हवाई भाडे हे अनेकांना परवडणारे असू शकते. त्यामुळे हवाई प्रवासाचे स्वप्न आता स्वप्न राहणार नाही तर प्रत्यक्षात उतरु शकते. हे सर्व प्रादेशिक हवाई संपर्क योजनेंतर्गत कार्यरत असून एअरलाइन ऑपरेटर्सना यामध्ये विविध सवलती मिळतात.


22 मार्गांवर 1000 रुपयांपेक्षा कमी भाडे 


देशात असे किमान 22 मार्ग आहेत जिथे मूळ विमान भाडे प्रति व्यक्ती 1,000 रुपयांपेक्षा कमी आहे. आसाममधील लीलाबारी आणि तेजपूर यांना जोडणाऱ्या फ्लाइटचे सर्वात कमी वन-वे भाडे रु. 150 आहे. ट्रॅव्हल पोर्टल 'Ixigo' च्या अहवालात यासंदर्भात माहिती दिली आहे.  येथे तुम्हाला स्वस्त फ्लाइट टिकट बुकिंग करता येईल. अलायन्स एअर या उड्डाणांचे संचालन करते. तिकीट बुक करताना सुविधा शुल्क देखील मूळ भाड्यात जोडले जाते हे देखील प्रवाशांनी लक्षात ठेवायला हवे. 


बहुतेक मार्गांवरील भाडे 150 ते 199 रुपयांपर्यंत


सर्वसाधारणपणे, या मार्गांवर रिजनल कनेक्टिव्हिटी स्कीम (RCS) अंतर्गत चालवल्या जाणाऱ्या फ्लाइट्स असतात. यांचा कालावधी साधारण 50 मिनिटांचा आहे.  जेथे मूळ हवाई भाडे 150 ते 199 रुपये प्रति व्यक्ती आहे. बंगळुरू-सालेम, कोचीन-सालेम सारखे दक्षिणेकडील मार्ग देखील आहेत. जिथे मूळ तिकिटांच्या किंमती या श्रेणीत असल्याची माहिती देण्यात आली आहे.


गुवाहाटी आणि शिलाँगला जाण्यासाठी आणि जाण्यासाठी फ्लाइटचे मूळ भाडे 400 रुपये आहे. इंफाळ-ऐझॉल, दिमापूर-शिलाँग आणि शिलाँग-लीलाबारी फ्लाइटचे भाडे 500 रुपये, बेंगळुरू-सालेम फ्लाइटचे 525 रुपये, गुवाहाटी-पासीघाट फ्लाइटचे 999 रुपये आणि लीलाबारी-गुवाहाटी मार्गासाठी 954 रुपये आहे. त्यामुळे या दोन शहरांतील प्रवास तुम्ही 1000 रुपयांच्या आत करु शकता. 


तिकीट का कमी? 


नागरी उड्डयन मंत्रालयाने 21 ऑक्टोबर 2016 रोजी प्रादेशिक हवाई कनेक्टिव्हिटी योजनेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि हवाई प्रवास अधिक परवडण्याजोगा करण्याच्या उद्देशाने UDAN सेवा सुरू केली.


वर सांगण्यात आलेले हवाई मार्ग अशा मार्गांपैकी आहेत जिथे प्रवाशांची मागणी कमी आहे. तसेच इतर वाहतूक मार्गांनी या ठिकाणी पोहोचायला 5 तासांपेक्षा जास्त वेळ लागतो, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली. 


उड्डाण घेईल देशाचा सर्वसामान्य नागरिक या योजने अंतर्गत 31 मार्च 2024 पर्यंत प्रादेशिक कनेक्टिव्हिटी योजनेअंतर्गत 559 मार्ग चिन्हांकित करण्यात आलेयत. 


या फ्लाइट्ससाठी कोणतेही लँडिंग किंवा पार्किंग शुल्क नसते. 


केंद्र सरकार, राज्य सरकारे आणि विमानतळ ऑपरेटर प्रादेशिक उड्डाण सेवा अंतर्गत उड्डाणांसाठी विविध सवलती देतात.