Cheapest Cars Of India: मध्यमवर्गीय कुटुंबासाठी स्वत:चे घर घेणे आणि स्वत:ची कार घेणे हे सुंदर स्वप्न असते. परंतू अनेक कंपन्यांच्या गर्दीत बजेटमधील योग्य कार निवडण्यासाठी आपला गोंधळ उडतो. जाणून घ्या. भारतातील काही बजेट फ्रेंडली कारबद्दल...


BAJAJ QUTE


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


पेट्रोल आणि सीएनजी प्रकारांमध्ये उपलब्ध आहे. कारची किंमत जवळपास 2 लाख 48 हजार रुपये आहे. या कारचे मायलेज 35kmpl आहे.


DATSUN REDI-GO



Datsun redi-GO ही भारतातील सर्वोत्तम बजेट फ्रेंडली कार आहे. ही कार मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक अशा दोन्ही प्रकारांमध्ये उपलब्ध आहे. कारची इंधन टाकीची क्षमता 28 लीटर आहे आणि मायलेज 22.7kmpl आहे. कारची किंमत सुमारे 2 लाख 79 हजार रुपये आहे.


मारुती अल्टो 800



मारुती हा भारतातील विश्वासार्ह ब्रँड आहे. Maruti Alto 800 मध्ये तुम्हाला 3 सिलेंडर, मॅन्युअल इंजिन आणि 22.05kmpl मायलेज मिळेल. कारची किंमतही जवळपास 2 लाख 94 हजार रुपये आहे.


Renault Kwid



Renault Kwid ही भारतातील सर्वात परवडणारी कार आहे. 25.17kmpl मायलेज असून 28 लिटरच्या इंधन साठवण्याची क्षमता असलेल्या या कारची किंमत 2 लाख 92 हजार रुपये आहे.


मारुती एस-प्रेसो

 


जर तुम्ही तुमचे बजेट थोडे जास्त वाढवले ​​तर तुम्ही मारुतीची S-Presso देखील खरेदी करू शकता. या कारची किंमत 3 लाख 70 हजार रुपये आहे. या कारचाम मायलेज 21.4kmpl इतका आहे.