बँक खात्याशी आधार कार्ड लिंक झालं की नाही कसं ओळखाल?
आधार कार्ड लिंक करण्यावरून अनेक प्रश्न सामान्य नागरिकांना पडत आहेत.
मुंबई : आधार कार्ड लिंक करण्यावरून अनेक प्रश्न सामान्य नागरिकांना पडत आहेत.
आधार कार्ड बँक खात्यात लिंक करण्यावरून अनेक प्रश्न विचारले जात आहेत. 31 मार्च पर्यंत बँक खात्याशी आधार कार्ड लिंक केले गेले नाही तर बँक खाते बंद होऊ शकते. अधिक लोकांनी बँकेत जाऊन खातं लिंक केलं आहे. मात्र ते नीट झाले की नाही हे कसे ओळखावे यासाठी अगदी सोपी पद्धत आहे.
कोणत्या गोष्टींशी लिंक करा आधार
1) मोबाइल बँक
2) पॅनकार्ड
3) बँक अकाऊंट
4) एलपीजी गॅस कनेक्शन
5) रेशन कार्ड
6) वोटर आयडी
या सोप्या पद्धतीने पाहू शकता
सगळ्यात अगोदर UIDAI या वेबसाईटवर म्हणजे uidai.gov.in या वेबसाईटवर जा. त्यानंतर आता आधार सेवा सेक्शनवर क्लिक करा. त्यानंतर ‘Check Aadhaar & Bank Account Linking Status’ यावर क्लिक करा.
ओटीपीच्या माध्यमातून जाणून घ्या
यावर क्लिक केल्यावर नवीन पेज उघडेल. तिथे 12 अंकी आधार नंबर टाकायचा आहे. त्यानंतर सिक्युरिटी कोड दाखवला जाईल. त्यानंतर एक ओटीपी नंबर येईल तुमच्या रजिस्टर मोबाइल नंबरवर येईल.
लिंक झाल्यावर येईल हा मॅसेज
ओटीपी टाकून लॉगिन केल्यानंतर आपल्या बँक खात्याशी आधार कार्डनंबर लिंक झाल्यावर तुम्हाला “Congratulations! Your Bank Aadhaar Mapping has been done” हा मॅसेज येईल.