मुंबई : तुम्ही नोकरी करत असाल आणि तुमचा पीएफ अकाऊंट (PF account) असेल तर तुमच्यासाठी ही बातमी फायदेशीर ठरणार आहे. कारण तुमच्या पगारातून कापली जाणारी पीएफची रक्कम किती जमा झाली आहे. हे आता तुम्हाला एका झटक्यात कळणार आहे. पेन्शन सुविधा देणाऱ्या EPFO ​​ने आता व्याजाची रक्कम हस्तांतरित करण्यास सुरुवात केली आहे. ईपीएफओ सदस्यांच्या मोबाईलवर पैसे क्रेडिटचे एसएमएसही येत आहेत.


UAN शिवाय तपासता येणार बॅलेन्स


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तुमच्या पीएफ खात्याची शिल्लक (PF Balance) तपासायची असेल, तर आता यासाठी तुम्हाला कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्थेकडे जाण्याची गरज नाही. यासाठी तुमच्याकडे UAN नंबर असण्याचीही गरज नाही. UAN नंबर विसरले आहात तर तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. UAN नंबर नसतानाही तुम्ही तुमच्या PF खात्यातील शिल्लक तपासू शकता.


1. पीएफ खात्यातील शिल्लक तपासण्यासाठी प्रथम तुम्हाला त्याची अधिकृत वेबसाइट epfindia.gov.in ला भेट द्यावी लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमची ईपीएफ शिल्लक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा या पर्यायावर क्लिक करावे लागेल.


2. तुम्हाला रीडायरेक्ट लिंकद्वारे epfoservices.in/epfo/ च्या पेजवर रीडायरेक्ट केले जाईल. यानंतर तुम्हाला 'मेम्बर बॅलन्स इन्फॉर्मेशन' या पर्यायावर क्लिक करावे लागेल. यानंतर तुम्हाला तुमचे राज्य निवडावे लागेल आणि तुमच्या राज्याच्या EPFO ​​कार्यालयाच्या वेबसाइट लिंकवर क्लिक करावे लागेल.


3. तुम्हाला तुमचा 'पीएफ खाते क्रमांक', नाव आणि नोंदणीकृत मोबाईल क्रमांक टाकावा लागेल. त्यानंतर तुम्हाला 'सबमिट' या पर्यायावर क्लिक करावे लागेल. ही प्रक्रिया पूर्ण होताच, तुमच्या PF खात्याची शिल्लक तुमच्या वेबसाइटवर दिसेल.


4. तुम्ही EPFO ​​च्या SMS सेवेअंतर्गत तुमच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरून EPFOHO UAN या क्रमांकावर 7738299899 वर पाठवून तुमच्या PF खात्याची शिल्लक देखील तपासू शकता. तुम्ही तुमच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरून 011-229014016 वर मिस्ड कॉल करून तुमची पीएफ खात्यातील शिल्लक तपासू शकता.