19 वर्षाच्या फूड डिलिव्हरी बॉय सामान घेऊन जायला थोडा उशिर झाल्याने टोकाचं पाऊल उचललं आहे. प्रकरण असं आहे की, महिलेने सामान डिलिव्हरीची ऑर्डर दिली ही ऑर्डर घेऊन जायला या तरुण डिलिव्हरी बॉयला उशीर झाला. तेव्हा महिला ग्राहक आणि या तरुणाद वाझ झाला. एवढंच नाही तर या महिलेने वाद वाढल्यावर डिलिव्हरी बॉय विरोधात पोलिसात तक्रार केली. पोलिसांनी चौकशी केल्यावर त्याला सोडून दिलं. मात्र आता मिळालेल्या माहितीनुसार, या डिलिव्हरी बॉयने आत्महत्या केली होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हा संपूर्ण प्रकार चेन्नई शहरातील फूड एग्रीगेटरकरिता पार्ट-टाइम काम करणाऱ्या 19 वर्षीय डिलिव्हरी एक्झिक्युटिव पवित्रन नावाच्या तरुणासोबत घडला आहे. मंगळवारी कोलाथुरमध्ये त्याने आपल्या राहत्या घरी आत्महत्या केली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, सामान उशिरा पोहोचवल्यामुळे तरुणाचे एका महिलेसोबत भांडण झाले. या वादानंतर त्याने टोकाचे पाऊल उचलले आहे. 


विद्यार्थी आणि पार्टटाईम डिलिव्हरी बॉय 


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा तरुण बीकॉमचा विद्यार्थी होता. पार्ट टाईम फूड डिलिव्हरी करण्याचं काम करत होता. 11 सप्टेंबर रोजी पवित्रनला कोरट्टूरमध्ये एका महिला ग्राहकाकडे किराणा मालाचं सामान पोहोचवायचं होतं. यावेळी घर शोधताना त्याला खूप अडचणी आल्या यामुळे डिलिव्हरी करायला उशिर देखील झाला. यावेळी महिला नाराज झाली आणि तिने त्याची तक्रार पोलिसांत केली. 


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिला आणि पवित्रन यांच्यात वाद झाला. महिलेने त्या तरुणाची फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्मवर तक्रार केली. यामुळे कंपनीने तरुणाविरोधात कारवाई केली. पण त्याच्या विरोधात नेमकी काय कारवाई झाली याची अद्याप माहिती नाही. 


पोलिसांनी समज देऊन सोडलं 


हा वाद तेव्हा वाढला जेव्हा पवित्रन ग्राहक महिलेच्या घरी पुन्हा आला आणि त्याने त्या महिलेच्या घराची खिडकीवर दगड मारुन काच फोडली. महिलेने नंतर कोराट्टू पोलिसात मुलाविरोधात तक्रार केली. ज्यानंतर दुसऱ्या दिवशी पोलिसांनी पवित्रनला शोधून त्याला चौकशीसाठी बोलावले आणि 
तरुणाला समज देऊन सोडलं. पोलिसांनी तरुणावर कोणतीही अधिकृत कारवाई केली नाही. 


घरी केली आत्महत्या 


चौकशी दरम्यान तरुणाचे पालक तेथे उपस्थित होते. अधिकाऱ्यांना आशा होती की, हे प्रकरण येथेच संपेल. तर डिलिव्हरी बॉयच्या मनाला ही गोष्ट फार लागली. या वादाच्या 5 दिवसानंतर तरुणाने आत्महत्या केली. त्याच्या खोलीत त्याचा मृतदेह सापडला. तरुणाने सुसाईड नोट लिहिली असून त्यामध्ये महिला ग्राहकासोबत झालेल्या वादाचा उल्लेख केला आहे. पोलिसांनी या प्रकरणाबाबत केस दाखल केली आहे. आता पोलीस चौकशी करत आहेत की, डिलिव्हरी प्लॅटफॉर्मने तरुणावर काय कारवाई केली याची देखील चौकशी केली जाणार आहे.