तुमचे या बँकांमध्ये खाते आहे का?
भारतीय स्टेट बँकेत विलीनीकरण झालेल्या बँकामध्ये तुमचे खाते आहे तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. कारण एसबीआयमध्ये विलीनीकरण झालेल्या सहा बँकांचे जुने चेक ३० सप्टेंबरनंतर बंद होणार आहेत.
नवी दिल्ली : भारतीय स्टेट बँकेत विलीनीकरण झालेल्या बँकामध्ये तुमचे खाते आहे तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. कारण एसबीआयमध्ये विलीनीकरण झालेल्या सहा बँकांचे जुने चेक ३० सप्टेंबरनंतर बंद होणार आहेत.
स्टेट बँकेने ५ सहयोगी बँका आणि भारतीय महिला बँकेच्या ग्राहकांना लवकरात लवकर नवे चेकबुक घेण्याची सूचना केली आहे. ५ सहयोगी बँका आणि भारतीय महिला बँकेच्या ग्राहकांना विनंती केली जात आहे की त्यांनी ३० सप्टेंबर आधी एसबीआयच्या नव्या चेकबुकसाठी अर्ज करावेत. अन्यथा ३० सप्टेंबरनंतर जुने चेक अवैध ठरवले जातील.
एक एप्रिल २०१७मध्ये स्टेट बँक ऑफ बीकानेर अँड जयपूर(SBBJ), स्टेट बँक ऑफ हैदराबाद (SBH), स्टेट बँक ऑफ मैसूर(SBM),स्टेट बँक ऑफ पटियाला(SBP), स्टेट बँक ऑफ त्रावणकोर(SBT) आणि भारतीय महिला बँक या बँकांचे स्टेट बँकेत विलीनीकरण करण्यात आले.