रायपूर : एका मुख्यमंत्र्यांच्या गांड्यांच्या ताफ्यामध्ये चक्क १९ नव्या गाड्या येणार आहेत. यासाठी या राज्याच्या सरकारने १९ नव्या गाड्या खरेदी केल्या आहेत.


१९ नव्या गाड्या 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

छत्तीसगड सरकारने मित्सुबिशी कंपनीच्या १९ पजेरो स्पोर्ट्स गाड्या खरेदी केल्या आहेत.  विशेष म्हणजे या सर्व गाड्यांचा नंबर '००४' ने संपतो. या सर्व १९ गाड्या मुख्यमंत्री रमन सिंह यांच्या ताफ्यात येणार आहेत.


गाड्यांमध्ये अत्याधुनिक सुविधा


छत्तीसगड सरकारचे प्रवक्त्यांनी म्हटलं की, मुख्यमंत्री रमन सिंह यांच्यातील गाड्या बदलल्या जाणार आहेत. त्यांच्या ताफ्यामध्ये नव्या एसयूवी स्पोर्ट्स गाड्या आणल्या जाणार आहेत. कोणत्याही प्रकारच्या रस्त्यावर चालण्याची क्षमता या गाड्यांमध्ये आहे. तसेच अनेक अत्याधुनिक सुविधा या गाड्यांमध्ये देण्यात आली आहे.


सुरक्षेच्या कारणास्तव निर्णय


प्रवक्त्यांनी म्हटलं की, 'याआधी मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील आधीच्या गाड्यांचे नंबर शेवटी '००५ होते. आता या नव्या गाड्यांचे नंबर शेवटी '००४' असणार आहेत. छत्तीसगड हे नक्षलवादी प्रभावित राज्य आहे. रमन सिंह यांना झेट प्लस सुरक्षा आहे सोबतच त्यांच्या सुरक्षेसाठी एनएसजी कमांडो देखील आहेत.