नवी दिल्ली: छत्तीसगढच्या सुकमा जिल्ह्यात सोमवारी झालेल्या चकमकीत सुरक्षा दलाच्या जवानांनी १४ दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. येथील कोणता व गलापल्ली या पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील परिसरात ही चकमक झाली. हा परिसर छत्तीसगढच्या दक्षिण टोकाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आज सकाळी नुलकाताँग गावात सुरक्षा दलाचे जवान आणि नक्षलवादी आमनेसामने आले. त्यानंतर दोन्ही बाजूंनी तुफान गोळीबार सुरु झाला.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत नक्षलवाद्यांमध्ये १४ साधारण नक्षलवादी,  पाच लाखांचे इनाम असलेला प्रादेशिक समितीचा एक सदस्य आणि एका महिला नक्षलवाद्याचा समावेश आहे. आम्हाला आज सकाळी नक्षलवाद्यांचा ठावठिकाणा कळला. येथे २० ते २५ जण असण्याची शक्यता आहे. अजूनही सुकमातील अंतर्गत भागात चकमक सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.