रायपुर : केंद्र सरकारने लॉकडाऊनच्या तिसऱ्या स्टेपमध्ये दारू विक्रीला परवानगी दिली आहे. सोमवारपासून दारू विक्रीला सुरूवात झाली आहे. जवळच्या दीड महिन्यांनंतर दारू विक्रीला सुरूवात झाल्यामुळे लोकांनी सोशल डिस्टन्शिंगचे सर्व नियम धाब्यावर बसवत राज्यात जवळपास १७ कोटी रुपयांची खरेदी केली. या परिस्थितीत कोरोनाबाधित रूग्णांची संख्या वाढण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. हा धोका टाळण्यासाठी अनेक राज्य वेगवेगळे प्रयोग करत आहेत. 


या राज्यात होणार दारूची होम डिलिव्हरी 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

छत्तीसगडच्या राज्य सरकारने ग्रीन झोनमध्ये देखील दारूची होम डिलिव्हरी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. याकरता एक वेब पोर्टल आणि ऍप तयार करण्यात आलं आहे. ज्याद्वारे लोक ऑर्डर देऊन दारू आपल्या घरी मागवू शकतात. या पोर्टलला छत्तीसगड स्टेट मार्केटिंग कॉर्पोरेशन लिमिटेड नाव देण्यात आलं आहे. सूचना विभागाच्या अधिकाऱ्यांनी याची माहिती दिली आहे. 


२३ मार्चपासून बंद आहे दारूची दुकाने 


राज्यात २३ मे पासून दारू विक्री बंद करण्यात आली. त्यानंतर ४ मेपासून सोमवारी दारूची दुकाने सुरू करण्यात आली. राजधानी रायपुर जिल्ह्यात दारू खरेदीकरता आलेल्या ग्राहकांनी सोशल डिस्टन्शिंगचे सर्व नियम मोडले.