रायपूर : छत्तीसगढच्या नक्षलवादी प्रभावित सुकमा जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी स्फोट घडवून अ‍ॅन्टी लॅंडमाइन व्हेईकलला उडवलं. या घटनेत सीआरपीएफचे आठ जवान शहीद झाले. तर काही जवान जखमी झाले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सीआरपीएफच्या अधिका-यांनी सांगितले की, जिल्ह्यातील किस्टाराम पोलीस स्टेशन क्षेत्रात नक्षलवाद्यांनी भुसुरूंग स्फोट करत अ‍ॅन्टी  लॅंडमाईन व्हेईकल उडवली. या घटनेत आठ सीआरपीएफचे जवान शहीद झालेत.




अधिका-यांनी सांगितले की, मंगळवारी सीआरपीएफच्या २१२ व्या बटालियनचे जवान अ‍ॅन्टी लॅंडमाईन व्हेईकलमध्ये बसले होते. जेव्हा ते किस्टाराम पोलीस स्टेशनच्या हद्दीत होते तेव्हा नक्षलवाद्यांनी शक्तीशाली स्फोट घडवून गाडी उडवली. या घटनेनंतर अतिरीक्त पोलीस दलाला रवाना करण्यात आले आहे. जवानांचे मृतदेह आणि जखमींना जंगलातून बाहेर काढण्याचे काम सुरू आहे.