Shocking News : छत्तीगडमध्ये (Chhattisgarh News) एक तरुणी 80 फूट उंच हाय टेंशन लाइन टॉवरवर (High Tension Power Line) चढल्याने एकच खळबळ उडाली होती. प्रियकरावर रागवून ही तरुणी टॉवरवर चढली होती. काही केल्या तरुणी खाली येण्यास तयारच नव्हती. शेवटी प्रियकर देखील तिच्या मागे मागे वर गेला आणि त्याने तिला खाली येण्यास सांगितले. मात्र तरीही तरुणीने खाली येण्यास नकार दिला. दोघेही टॉवरवर चढल्याने आजूबाच्या परिसरात घबराट पसरली. दोघांच्या कुटुंबियांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पोलिसांना ( Chhattisgarh Police) बोलवण्यात आलं. बराच वेळा हायव्होल्टेज ड्रामा सुरु होता. बराच वेळ समजवल्यानंतर दोघेही खाली आले. आता या घटनेचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

छत्तीसगडमधील गौरेला पेंद्र मारवाही जिल्ह्यात तिच्या प्रियकरावर रागावलेली प्रेयसी हाय टेंशन पॉवर लाइनच्या 80 फूट उंच टॉवरवर चढली होती. त्यानंतर प्रेयसीचे मन वळवण्यासाठी प्रियकरही तिच्या मागे टॉवरच्या टोकावर गेला. दोघांना पाहताच लोक आणि कुटुंबीयांना धक्का बसला होता. या घटनेची माहिती तात्काळ पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन दोघांना समजावून सांगितले. बऱ्याच प्रयत्नानंतर दोघांची समजूत काढण्यात पोलिसांना यश आले आणि त्यांना खाली उतरवण्यात आले. 


गौरेला पेंद्र मारवाही जिल्ह्यातील पेंद्र पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा सगळा धक्कादायक प्रकार घडला. इथल्या एका गावातील तरुणीचे गावातीलच तरुणासोबत प्रेमसंबंध होते. रविवारी फोनवर बोलत असताना दोघांमध्ये कशावरून तरी भांडण झाले. त्यानंर संतापलेली प्रेयसी गावाबाहेर असलेला हाय टेन्शन लाईनच्या 80 फूट उंच टॉवरवर चढली. हळूहळू सगळ्या गावात ही गोष्ट कळाली. त्यानंतर तरुणीचा प्रियकर तिला खाली येण्याची विनंती करत होता. पण प्रेयसीने काही ऐकलं नाही आणि ती आणखी वर जावू लागली. त्यानंतर प्रियकर देखील टॉवरवर चढला आणि टॉवरच्या टोकावर पोहोचला. दोघांनाही टॉवरवर पाहून गावकरी आणि त्यांच्या कुटुंबीयांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. टॉवरखाली गावकऱ्यांची तुफान गर्दी जमली. लोकांनी खालून आरडाओरडा करून दोघांना खाली येण्यास सांगितले, पण दोघेही खाले नाहीत.



लोकांनी स्थानिक पोलिसांना याची माहिती दिली. घटनेचं गांभीर्य ओळखून पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि दोघांना खाली येण्याची सूचना केली. पोलीस आले तरी दोघेही टॉवरच होते. त्यांच्यापासून अवघ्या काही फूट अंतरावर हाय टेंशन करंटची वायर गेली होती. थोडीशी चूक त्यांच्या जीवावर उठली असती. पोलिसांनी टॉवरवर चढलेल्या प्रियकर-प्रेयसीची समजूत काढण्यास सुरुवात केली. कित्येक तासांच्या धडपडीनंतर दोघेही खाली यायला तयार झाले आणि हळू हळू टॉवरवरून खाली आले. पोलिसांनी याप्रकरणी कोणताही गुन्हा दाखल केला नाही. मात्र त्यांची समजूत काढून त्यांना सोडून दिलं.