चेन्नई : देशात कोरोना रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. तिसऱ्या लाटेच्या शक्यतेने सरकारी यंत्रणा हादरल्या आहेत. त्यामुळे राज्य सरकारांनी लसीकरण वाढवण्यासाठी सर्व प्रयत्न सुरू केले आहेत. प्रशासन नागरिकांना सर्व  खबरदारी घेण्याच्या सूचना वेळोवेळी देत आहे. तामिळनाडूमध्ये सक्रीय रुग्णांची संख्या 10 हजाराच्या पुढे गेली आहे. दरम्यान तामिळनाडूमध्ये कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता. स्वतः मुख्यमंत्री एम के स्टॅलिन हे रस्त्यावर उतरल्याचे दिसून आले. मुख्यमंत्र्यांनी स्वतः रस्त्यावर उतरून जन-जागृतीचा प्रयत्न केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तामिळनाडू प्रशासनाकडून नागरिकांना खबरदारीच्या सूचना देण्यात येत आहेत. तरीदेखील अनेक नागरिक बेजबाबदारपणे वागताना दिसून येतात. अनेकजण मास्क सुद्धा लावत नाहीत.



त्यामुळे मुख्यमंत्री स्टॅलिन स्वतः गाडीमधून उतरले. त्यांनी लोकांना मास्कचे वाटप केले. तसेच काहींना स्वतःहून मास्क घातले. मुख्यमंत्र्यांनी त्यांचा ताफा अशा ठिकाणी थांबवला ज्या ठिकाणी लोक त्यांना मास्कशिवाय दिसून येत होते.


एम के स्टॅलिन यांना वाटेत मास्क न घातलेले लोकं दिसल्याने, त्यांनी ताफा थांबवला. अनेक ठिकाणी स्वतः रस्त्यावर उतरत मास्कचे वाटप केले.  तामिळनाडूमध्ये कोरोना रुग्णांची संख्या 10  हजाराच्या वर गेली आहे.