पणजी : गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यामधील माणुसकीचे दर्शन गोवेकरांना घडले. प्रमोद सावंत काल रात्री दिल्लीहून गोव्यात परतले. विमानतळावरुन ते पणजीला जात असताना, वाटेत झुअरी उड्डाणपुलावर त्यांनी अपघात झाल्याचे पाहिले. तात्काळ पुढे सरसावत मुख्यमंत्र्यांनी जखमी रुग्णांना रुग्णालयात पोहोचवण्याची व्यवस्था केली. यासाठी त्यांनी आपल्या ताफ्यातल्या गाडीमधून जखमी पर्यटक महिलेला रुग्णालयात पोहोचवले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुख्यमंत्री सावंत दिल्लीला गेले होते. ते रात्री गोव्यात परतले. दाबोळी विमानतळावरुन ते येत होते. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी अपघाग्रस्त महिलेला पाहीले. त्यांनी आपल्या ताफ्यातील वाहन थांबविण्यास चालकाला सांगितले. महिला जखमी असल्याचे लक्षात येतात त्या महिलेची विचारपूस केली. त्यानंतर ताफ्यातील एका वाहनाद्वारे त्या महिलेला रुग्णालायत उपचारासाठी हलविले. ही महिला केरळ येथील असल्याची माहिती मिळत आहे.