COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ठाणे : प्लास्टिक बंदीचं सर्वच स्तरातून स्वागत होताना दिसतंय. ठाण्यातही ग्राहक आणि चिकन विक्रेत्यांनी या बंदीचं स्वागत केलं. घरातून डब्बा किंवा कापडी पिशव्या घेऊन येण्याचं आवाहन विक्रेत्यांनी पोस्टरच्या माध्यमातून केलंय. तर काही दुकानदारांनी कापडी पिशव्या दुकानात ठेवल्यात. मात्र चिकनच्या ओलाव्यामुळे कापडी पिशव्यांमधून पाणी गळतं अशी खंत दुकानदारांनी व्यक्त करून दाखवली. लांबच्या पल्ल्यासाठी कापडी पिशव्या योग्य नाहीत यावर काही पर्याय सुचवावा अशी विनंती दुकानदारांनी शासनाकडे केली आहे.


आजपासून राज्य सरकारनं मुंबईसह राज्यभर प्लास्टिक बंदी लागू केलीये. प्लास्टिक बंदीसाठी सरकारनं दंडात्मक कारवाई निश्चित केली आहे. त्यानुसार पहिल्यांदा प्लास्टिक आढळल्यास पाच हजार रुपये, दुसऱ्यांदा प्लास्टिक आढळल्यास दहा हजार रुपये आणि तिसऱ्यांदा प्लास्टिक आढळल्यास २५ हजार रुपये आणि तीन महन्यांची तुरुंगवासाची शिक्षा भोगावी लागणार आहे. कारवाईची नामुष्की टाळण्यसाठी सर्वांनी जवळ असलेलं प्लास्टीक पालिकेच्या संकलन केंद्रात जमा करावं असं आवाहन करण्यात आलं आहे.