नवी दिल्ली : भारत आणि चीन दरम्यान प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (एलएसी) सुरू असलेला वाद कायम आहे. चीनचे एक नवीन षडयंत्र समोर आले आहे. चीनने भारतीय चौक्यांसमोर टँक तैनात केले आहेत. एलएसीवर गेल्या 8 महिन्यांपासून भारत आणि चीनमध्ये सध्या वातावरण गरम आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एलएसीवर चीनने रेजांग ला, रेचिन ला आणि मुखोसरी येथे टँक तैनात केले आहेत. झी मीडियाकडे याचा एक्सक्लुझिव्ह व्हिडिओ आहे. ज्यामध्ये चीनने सीमेवर भारतीय चौक्यांसमोर 30-35 लाईट आणि आधुनिक टँक तैनात केल्याचं दिसत आहे.


चीनलाही योग्य उत्तर देण्यासाठी भारताने पूर्ण तयारी केली असून पहिल्यांदाच १७ हजार फुटांवर टँक तैनात केले आहेत. पहिल्यांदाच अशा उंच टेकडीवर भारताने टँक तैनात केले आहेत. 



भारत आणि चीन यांच्यात वाद गेल्या वर्षी मे मध्ये सुरू झाला होता, तेव्हा चीनने लडाखमधील गलवान खोऱ्यात रस्ता तयार करण्याबाबत आक्षेप नोंदविला होता. भारतीय सैन्य आणि चिनी सैन्याच्या दरम्यान झालेल्या हिंसक संघर्षानंतर वाद आणखी वाढला. यानंतर चीनशी लागून असलेल्या सर्व सीमांवर सैन्याची संख्या वाढवली गेली असून त्यांना अलर्टवर ठेवण्यात आले आहे.