अरुणाचल प्रदेशच्या ५ तरुणांना चीनने भारताकडे सोपवलं; २ सप्टेंबरपासून होते बेपत्ता
भारतीय सेनेकडून सतत दबाब आणल्यानंतर, अखेर पाच तरुणांची सुटका करण्यात आली.
ईटानगर : अरुणाचल प्रदेशमधून (arunachal pradesh) 2 सप्टेंबरला बेपत्ता झालेल्या 5 तरुणांना चीनच्या पीपल्स लिब्ररेशन आर्मीने PLA भारताकडे सोपावले आहेत. या तरुणांना भारताकडे सोपवण्यापूर्वी ग्लोबल टाईम्सने दावा केला होता की, ते भारतीय सेनेचे हेर असल्याचं म्हटलं होतं. परंतु भारतीय सेनेच्या सततच्या दबावानंतर PLAने (People's Liberation Army) त्यांना सोपवण्याची सहमती दर्शवली.
सेनेच्या तेजपूर छावणीच्या प्रवक्तांनी ट्विट करुन सांगितलं की, पाच तरुणांना शनिवारी सकाळी 9.30 वाजता अरुणाचलच्या दमाईमध्ये भारतीय सेनेकडे सुपुर्द करण्यात आले.
हे पाच तरुण 2 सप्टेंबर रोजी भूलवश सीमा पार करुन चीनच्या भागात पोहचले होते. त्यानंतर PLAने त्यांना ताब्यात घेतलं होतं. त्यांच्यापासून आपला बचाव करत आलेल्या दोन तरुणांनी याबाबतची माहिती दिली. त्यानंतर त्या पाच तरुणांना PLAने ताब्यात घेतल्याची बाब सर्वांसमोर आली.
त्यानंतर भारतीय सेनेने हॉटलाईनवर चीनी सेनेला संपर्क करुन पाच तरुणांना सोडण्याची विनंती केली. परंतु PLAने कोणत्याही तरुणाला ताब्यात घेतल्याची बाब नाकारली. मात्र भारतीय सेनेकडून सतत दबाब आणल्यानंतर, अखेर पाच तरुणांची सुटका करण्यात आली.