नवी दिल्ली : लडाखपाठोपाठ आता अरूणाचल प्रदेशात भारत चीन (China) संघर्ष उफाळण्याची चिन्हे आहेत.( INDO-CHINA TENSION) अरूणाचल प्रदेशात  ( Arunachal Pradesh) भारतीय हद्दीत चीनने १०० पक्क्या घरांचं खेडं उभारल्याचा दावा भाजप खासदार तापीर गाओ यांनी केला आहे. (China has constructed a new village in Arunachal Pradesh)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चीनने (China) अरूणाचल प्रदेशात ( Arunachal Pradesh)१०० घरांचे खेडं, एक बाजारपेठ आणि दोन लेनचा पक्का रस्ता भारतीय हद्दीत उभारल्याचा दावा गाओ यांनी केला आहे. या दाव्याची दखल घेत भारतीय परराष्ट्र खात्याने देशाची सार्वभौमता टिकवण्यासाठी सर्व प्रयत्न केले जातील, असा दावा केला आहे. तर काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी सरकारवर तोफ डागली आहे. सरकार पुन्हा चीनला क्लिनचीट देणार का, असा सवाल चिदंबरम यांनी विचारला आहे. आता केंद्र सराकर काय भूमिका घेते याकडे लक्ष लागले आहे.


अरुणाचल प्रदेशात चीनने नवीन गाव वसवले केले आहे. राज्यातील अप्पर सबनसिरी जिल्ह्यातील तसरी नदीच्या काठावर हे गाव वसवले आहे. अरुणाचल प्रदेश हा दक्षिण तिबेटचा भाग असल्याचा दावा चीनने केला आहे, तर भारताचा हा भाग आहे. दरम्यान, परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने म्हटले आहे की अरुणाचल प्रदेशसह नागरिकांच्या जीवनामध्ये सुधारणा करण्यासाठी रस्ते आणि पुलांसह सीमेच्या पायाभूत सुविधांच्या बांधकामांना भारताने वेग दिला आहे.