इटानगर : जवळपास ७३ दिवसांपर्यंत सुरु राहिलेला डोकलाम विवाद शांत होत नाही तोवरच चीननं आणखी एक खेळी खेळण्याचा अयशस्वी प्रयत्न केला.   


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चीनच्या रस्ते निर्माण टीमनं डिसेंबर महिन्यातील शेवटच्या आठवड्यात अरुणाचलच्या तुतिंग भागात एक किलोमीटरपर्यंत आतमध्ये घुसखोरीचा प्रयत्न केला. ही घटना २८ डिसेंबरची असल्याचं सांगण्यात आलंय.  


तुतिंग उपखंडातील बिसिंग गावात भारतीय सैनिकांशी सामना झाल्यानंतर मात्र चीनी सैनिकांनी तिथचं सामान सोडून पळ काढला. सीमेवरील गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, इथं चीनी सैनिक रस्ते बनवण्याचा प्रयत्न करत होते. 


सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चीनी सैनिक जे सामान सोडून पळून गेलेत त्यात रस्ते बनवण्याच्या तसंच खोदकामाच्या अनेक अवजारांचा समावेश आहे.