लडाख: LACवरील तणावानंतर चीनला वारंवार सांगूनही कुरापती थांबत नाहीत. चर्चेतून तोडगा निघत नाही अशा परिस्थित आता चीननं आपला मोर्चा LAC सोबत उत्तराखंडच्या सीमेकडे वळवला आहे. चीन वारंवार भारताच्या सीमेत घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत आहे. आता पुन्हा एकदा चीननं उत्तराखंडच्या सीमेवर हालचाल सुरू केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मिळालेल्या माहितीनुसार उत्तराखंडच्या बाराहोटी सेक्टरमध्ये चीननं आपलं सैन्य पेट्रोलिंगसाठी पाठवलं आहे. चीनचे 35 सैनिक पेट्रोलिंग करत असल्याची माहिती मिळाली आहे. चीन वारंवार भारतात घुसखोरी करण्याचा प्रयत्न करतं आहे. त्याची शेकडो उदाहरणं आजवर जगानं बघितली आहेत. हेच चीन आता लडाख सीमेजवळ आणखी एक हवाईतळ उभारत असल्याची माहिती हाती आली होती. त्यामुळे सुरक्षेला धोका उत्पन्न होण्याची भीती आहे.  



लडाख सीमेवर चीनच्या हालचाली कमी होण्याचं चिन्हं दिसत नाहीत. आता लडाखपासून अगदी जवळ तिसरा लष्करी हवाईतळ उभारण्याचं काम चीननं हाती घेतलं आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शाकचे इथं चीनचा नवा एअरबेस तयार केला जातो आहे. काशगर आणि होगान इथं आधीपासूनच चीनची हवाईतळं आहेत.या दोन तळांदरम्यान 400 किलोमीटरचं अंतर आहे. त्यांच्या मधोमध तिसरा एअरबेस उभारून चीन लॉजिस्टिकची अडचण संपवतो आहे.


एकीकडे लडाख सीमेवर आपली ताकद वाढवत असतानाच उत्तराखंड सीमेवर बाराहोटी जवळ चीनची मानवरहित विमानं दिसली होती. त्यानंतर आता चीनचे सैनिकही दिसले. त्यामुळे भारतीय संरक्षण दल सतर्क झालं आहे. चीनच्या प्रत्येक चालीवर भारताची बारीक नजर आहे. चीनच्या या कुरापतींमुळे संरक्षण दल अलर्टवर आहे.