मुंबई : चायनीज टेलीकॉम गिअर मेकर कंपनी हुआवेन पीए केअर फंडासाठी सात कोटी रुपये दिल्याचं समोर आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भारतातील सहा राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच आहे. या पार्श्वभूमीवर कोरोनाविरोधात लढण्यासाठी हुआवे कंपनीने पीएम केअर फंडात सात कोटी रुपये दिल्याचं समजलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी हुआवेई या कंपनीनं काही दिवसांपूर्वीच भारताला शरीराचे तापमान तपासणीसंर्भातील अद्ययावत तंत्रज्ञान देण्याची तयारी दर्शविली होती.


हुआवेई इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी जय चेन यांनी इकॉनॉमिक्स टाइम्सला सांगितलं की, 'चीनमधील आमचा अनुभवाद्वारे भारतातील सध्याच्या कोरोनाच्या स्थिती विरोधात लढण्यासाठी शरिराचे तापमान तपासणीसंर्भातील अद्ययावत तंत्रज्ञानचा अभ्यास करत आहे. यात लवकरच आम्हाला यश येईल.' हुआवे कंपनीनं दिलेली मदत सध्या ट्विटरवर चर्चेचा विषय आहे. नेटकऱ्यांनी चीनकडून मदत घेण्यावर आक्षेप नोंदवला आहे. 


“या फंडाचे ७ कोटी रुपये हुवावेकडून प्राप्त झाले आहेत. प्रत्येकाला माहित आहे की हुवावे हा पीपल्स लिबरेशन आर्मी (पीएलए) चा बदललेला भाग आहे. चिनी कंपनी टिकटॉककडून ३० कोटी रुपये आले आहेत. पेटीएमने ३८% चिनी नियंत्रित भागधारणा दिली आहे



दरम्यान, कोरोनाविरोधात लढण्यासाठी भारती एअरटेल आणि रिलायन्स जिओ यांनी आधीच पीएम केअर फंडासाठी आपली मदत दिली आहे. रिलायन्स जिओने ५०० कोटी तर भारती एअरटेलने १०० कोटी रुपयांची मदत पीएम केअर फंडासाठी दिली आहे.