नवी दिल्ली : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्तानं वेगवेगळ्या आकारातल्या झेंड्यांची विक्री जोरदार सुरू आहे. परंतु, भारतीय तिरंग्याच्या विक्रीतही चीनचा दबदबा मार्केटवर दिसून येतोय.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'मेड इन चायना' तिरंगा आज रस्त्यारस्त्यावर विक्रीसाठी उपलब्ध असलेले दिसून येत आहेत. उल्लेखनीय म्हणजे, हा परदेशी तिरंगा 'मेड इन इंडिया' तिरंग्यापेक्षा ३०-३५ टक्के स्वस्त किंमतीत उपलब्ध आहे. यामुळे, भारतीय उत्पादक चिंतेत आहेत. यातही छोट्या उत्पादकांना याचा फटका सर्वाधिक बसताना दिसतोय. 


देशी आणि परदेशी झेंडे वेगवेगळ्या आकारात मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. या तिरंग्याची किंमत प्रती १०० पुढिलप्रमाणे दिसून येत आहेत...  


४ X ६ - देशी तिरंगा १३० रुपये तर चायनीज तिरंगा ९० रुपये 


६ X ९ - देशी तिरंगा १५० रुपये तर चायनीज तिरंगा १२० रुपये


८ X १२  - देशी तिरंगा १३० रुपये तर चायनीज तिरंगा २२० रुपये
 
भारतात बहुतेक तिरंगे खादी, सुती आणि सिल्कनं बनवले जातात. त्यामुळे त्यांची किंमत अधिक आहे. तर चीन स्वस्त कच्च्या मालाचा वापर करून हे तिरंगे बनवतात. केवळ दिल्लीत या तिरंग्यांचा बाजार ४-५ करोड रुपये असल्याचं सांगितलं जातंय. 


भारतात एकमेव उत्पादक आहे जो सरकारी विभागांना तिरंग्याचा पुरवठा करतो... तो म्हणजे कर्नाटक खादी अॅन्ड ग्रामोदय संयुक्त संघ... हा कर्नाटकच्या धारवाड जिल्ह्यातील बेंगारी गावात स्थित आहे.