नवी दिल्ली : हवाईहद्दीच्या नियमांचे उल्लंघन करत चीनी लष्कराच्या हेलिकॉप्टरने सोमवारी भारतीय हवाई हद्दीत प्रवेश केला. उत्तराखंड येथील चमोली जिल्ह्यातील बारहोती परिसरात ही घटना घडली. या परिसरात हे हेलिकॉप्टर बेकायदेशिररित्या घिरट्या घालत होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, चीनी लष्कराकडून गेल्या एक महिन्यात घडलेली ही चौथी घटना आहे. १० मार्चलाही चीनच्या तीन लष्करी हेलिकॉप्टर्सनी भारतीय हवाई हद्दीत बेकायदेशीररित्या प्रवेश केला होता.  ही हेलिकॉप्टर्स भारतीय हवाई क्षेत्रात ४ किलोमिटर आत घुसली होती. तसेच, पाच मिनिटांहून अधिक काळ टेहेळणी करत होती.


यापूर्वी चीनी हेलिकॉप्टर्सनी भारताचा अविभाज्यक भाग असलेल्या लडाखमध्येही प्रवेश केला होता. तेव्हा ही हेलिकॉप्टर्स १८ किलोमिटर आतमध्ये आली होती. या आधी २७ फेब्रुवारीलाही चीनी हेलिकॉप्टर त्रिशूल राजमार्ग येथे भारतीय हवाई हद्दीत आले होते.