नवी दिल्ली : डोकलाम आणि लडाखमध्ये भारत आणि चिनी सैन्य आमने-सामने आल्यानंतर युद्धाची भाषा जोर धरतेय. त्यामुळे, चीन युद्धासाठीची आपण तयारी करत असल्याचंही मीडियातून पसरवताना दिसतंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चीनच्या वेगवेगळ्या प्रांतांमधून रुग्णालयांत रक्तपेढ्यांत रक्त जमा केलं जातंय. वातावरण बिघडलंच तर सैनिकांना रक्ताची उणीव भासू नये, यासाठी ही तयारी... याशिवाय चीनी सैन्य भारताविरुद्ध युद्धादरम्यान तिबेटच्या विमानतळांचाही वापर करण्याची रणनीती बनवण्याचा प्रयत्न करतंय. 


चीनचं सरकारी वर्तमानपत्र ग्लोबल टाइम्सनं दिलेल्या माहितीनुसार, पीपल्स लिबरेशन आर्मीनं (PLA) चीनच्या हुनान प्रांतातील चांग्शाच्या एका रुग्णालयाचं ब्लड बँकमध्ये रुपांतर केलंय. यात स्थानिक सरकार नागरिकांना रक्तदान करण्याचं आवाहन करताना दिसतंय. तसंच चीनच्या हुबेई प्रांत आणि गुआंग्शी झुआंग स्वायत्त क्षेत्रासमवेत अनेक प्रांतातील मोठ्या हॉस्पीटलमध्ये रक्त जमा केलं जातंय.