Dalai Lama : चीनी सैन्यांच्या संदिग्ध हालचालींमुळे तवांग सीमेजवळ काही दिवसांपासून तणावस्थिती आहे(india china dispute). भारतात घुसखोरी करण्याचा चीनी सैन्यांचा प्रयत्न भारतीय सैन्याने हाणून पाडला. त्यातच आता चीनचा आणखी एक भयानक प्लान समोर आला आहे. भारत दौऱ्यावर असलेले बौद्ध धर्म गुरु दलाई लामा(Dalai Lama ) यांच्या विरोधात चीन भयानक कट रचत आहे. मात्र, भारतीय पोलिसांच्या सतर्कतेमुळे हा सगळा कट उघडकीस आला आहे. भारतातून चीनी गुप्तहेर महिलेला अटक करण्यात आली आहे(Chinese woman suspected of spying ). बिहार पोलिसांनी ही कारवाई केली आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चीन सातत्याने भारताविरोधात कुरघोडी करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, भारत चीनचे प्रत्येक मनसुबे हाणून पाडत आहे. यामुळेच आता चीनने नवा कट रचला आहे. यासाठीच चीन तिबेटी धर्मगुरू दलाई लामा यांना टार्गेट करण्याच प्रयत्न करत आहे. दलाई लामा यांची हेरगिरी करण्यासाठी चीनने एका महिलेला पाठवल्याचा दावा सुरक्षा यंत्रणांनी केला आहे. 


दलाई लामा यांच्या अनुयायांमध्ये राहून हेरगिरी करण्याचा या गुप्तहेर महिलेचा प्रयत्न होता. मात्र, त्याआधीच बिहार पोलिसांनी त्या महिलेला अटक केली आहे. यापूर्वी पोलिसांनी त्या महिलेचे स्केच प्रसिद्ध केले होते. 
बोधगया पोलिसांनी या संशयित चिनी गुप्तहेर महिलेला अटक केली आहे.  बोधगया येथील कालचक्र मैदानाबाहेरुन पोलिसांनी या महिलेला ताब्यात घेतले. दलाई लामा दररोज येथे प्रवचन देण्यासाठी येत असतात. बिहार पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साँग झियाओलान असे संशयित चिनी महिलेचे नाव आहे. 


2019 मध्येही ही चीनी महिला भारतात आली होती. पण, यानंतर ती पुन्हा चीनला गेली होती. त्यानंतर ती पुन्हा भारतात आली आणि नंतर नेपाळला गेली. नेपाळमध्ये काही दिवस राहिल्यानंतर ही महिला बोधगया  येथे आली होती. गया शहर पोलिसांचे एसपी अशोक प्रसाद आता संशयित महिलेची चौकशी करत आहेत. या महिलेबाबत आधीच अलर्ट जारी करण्यात आला होता. दलाई लामा यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली होती. 


दलाई लामा यांना चीन स्वतःचा सगळ्यात मोठा शत्रू का मानतं?


धैर्य, शांती व अहिंसेच्या मार्गाने जाणारे दलाई लामा यांना  तिबेटच्या स्वातंत्र्यासाठी जगभर जनमत तयार करण्यास अथक परिश्रम घेतले. ते तिबेटच्या अस्मिता व संघर्षाचे प्रतीक मानले जातात. दलाई लामा आणि चीन यांच्यातील वैर जवळपास संपूर्ण जगाला माहित आहे. 1959 मध्ये दलाई लामांनी तिबेट सोडलं आणि त्यांनी भारतात आश्रय घेतला. चिनी फौजा तिबेटमध्ये घुसल्यानंतर त्यांना तिबेट सोडणं भाग पडलं. तेव्हापासून आतापर्यंत म्हणजेच जवळपास 6 दशकं झाली दलाई लामा हे हिमाचल प्रदेशच्या धर्मशाला येथे राहतात.