मुंबई : बिहारच्या  (Bihar) राजकारणात मोठा भूकंप झाला आहे. चिराग पासवान यांना मोठा धक्का देण्यात आला आहे. लोक जनशक्ति पार्टी (LJP) अध्यक्षपदावरून काढून टाकण्यात आले आहे. चिराग पासवान आणि त्यांचे समर्थकही आर-पारच्या मूडमध्ये दिसून येत आहे. त्यामुळे बिहारच्या राजकारणात मोठी रंगत वाढली आहे. चिराग पासवान  (Chirag Paswan) यांना एलजेपी अध्यक्षपदावरून काढून टाकण्यात आले आहे. चिराग पासवान यांनी संध्याकाळी चार वाजता राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक बोलावली आहे. या बैठकीत ते मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, बंडखोर खासदारांवर मोठी कारवाई केली जाऊ शकते. चिराग पासवान आणि त्यांचे समर्थक आता अधिक आक्रमक झाले आहेत. चिराग पासवान हे मोठे पाऊल उचलण्याच्या तयारीत आहेत. दरम्यान, चिराग पासवान यांना पक्षाच्या अध्यक्ष पदावरुन हटविल्यानंतर सूरज भान सिंग (Suraj Bhan Singh) हे एलजेपीचे नवे प्रमुख म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.


चिराग पासवान दुखावले गेले


बिहारच्या राजकारण्यात या घडामोडीमुळे जोरदार चर्चा सुरु झाली आहे. चिराग पासवान यांनी भाजपला छुपा पाठिंबा दर्शविला होता. त्यामुळे पक्षातील अनेक लोक नाराज झाले होते. काहींनी तर चिराग यांच्या भूमिकेमुळे नाराजीही व्यक्त केली होती. त्यामुळे आता एलजेपी अध्यक्षपदावर चिराग पासवान यांना हटवल्यानंतर सूरज भान सिंग यांना नवे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष करण्यात आले आहे. भाऊ प्रिन्सच्या विश्वासघातामुळे चिराग पासवान खूप दुखावले आहेत. काकांच्या कृत्यावर चिराग आश्चर्यचकित नाही, परंतु प्रिन्सने त्यांचे समर्थन केल्याने चिराग पासवान दुखावले गेले आहेत.


चिराग पासवान यांनी शेवटच्या क्षणी पक्षाने विचारात न घेतलेल्यांना तिकीट देऊन त्यांना खासदार बनविले. मेहबूब अली कैसर आणि चंदन सिंग आणि वीणा सिंग हे त्याचे उदाहरण आहे. होळीच्या वेळी चिराग पासवान यांनी सहा पानांचे पत्र लिहून सर्व विषयांवर पशुपती पारस यांच्या तक्रारी दूर करण्याचा प्रयत्न केला.


चिराग यांनी ट्विटवर दु:ख केले व्यक्त



पक्षात सुरू असलेल्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर चिराग यांनी ट्विटरच्या माध्यमातून दु:ख व्यक्त केले आहेत. चिराग यांनी ट्विट केले आहे की, 'मी पापा आणि माझ्या कुटुंबाने बनवलेल्या या पार्टीला माझ्या कुटुंबासोबत ठेवण्यात प्रयत्न केला पण अयशस्वी ठरलो. पार्टी आईसारखी असते आणि आईची फसवणूक होऊ नये, असे मला वाटते. लोकशाहीमध्ये लोक सर्वोपरी असतात. पक्षावर विश्वास असणार्‍या लोकांचे मी आभार मानतो. मी एक जुने पत्र शेअर करत आहे.