मुंबई : सगळीकडे ख्रिसमसची जोरदार तयारी सुरू झाली आहे... 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अगदी बाजारात ख्रिसमसच्या गोष्टी खरेदीला यायला लागल्या आहेत. लहान मुलांमध्ये ख्रिसमस आणि खास करून सांताक्लॉजचे क्रेझ आहे. आता तर शाळांबरोबरच कॉर्पोरेट ऑफिसेसमध्ये देखील ख्रिसमस सेलिब्रेशन केलं जातं. यावेळी घर, ऑफिसेस सजवणं, ख्रिसमस ट्री तयार करणे, केक कापण आणि पार्टी याचं खास प्लानिंग केलं जातं. महत्वाचं म्हणजे हे सगळं सेलिब्रेशन फक्त एका धर्माचे लोकं न करता सगळेजण एकत्र येऊन हे खास सेलिब्रेशन केलं जातं. भारत हा असा देश आहे जेथे वेगवेगळ्या जाती - धर्माचे लोकं एकत्र येऊन सणवार साजरा करतात. तर अशावेळी नेमकं काय करायचं याच्या काही खास टिप्स....


डेकोरेशन असावे सगळ्यांपेक्षा वेगळे 


एका थर्माकोलवर एक कलर पेपर चिटकवून घरातीस सर्व लहान मुलांना त्यांच्या हाता - पायाचे ठसे देण्यास सांगावे. हे ठसे सुकल्यानंतर खास अशी सुंदर डिझाइन तयार होईल. तसेच त्यानंतर त्याला ग्लिटर किंवा गोट्यांनी त्याला सजवा. आणि जर कोणत्या लहान मुलाचा हा पहिला ख्रिसमस असेल तर त्याला खास वेगळ्या गोष्टी तयार करायला द्या. आणि काही खास गोष्टी असतील तर त्याला फ्रेम करून घरी ठेवा. ती आठवण कायम चिरंतर तुमच्यासोबत राहिल. 


पजामा पार्टी लहान मुलांसाठी असेल खास 


ख्रिसमस हा लहान मुलांसाठी खास क्षण असतो. त्याचं महत्वाचं कारण म्हणजे ख्रिसमसमधील सांताक्लॉजचे खास गिफ्ट. प्रत्येकाला माहित असतं सांताक्लॉज या दिवशी गिफ्ट आणून देतो. पजामा मधून तो लहान मुलांसाठी गिफ्ट आणतो अशी गोष्ट सांगितली जाते. त्यामुळे लहान मुलांना या पजामाचं खास वैशिष्ट्य आहे. ख्रिसमसच्या दिवसांत रेड रंगाची थिम ठेवा. लाल रंगाचे लाल रंगाच्या पजमामध्ये तुम्ही वेगवेगळे गिफ्ट देखील ठेवू शकता. आणि ते गिफ्ट लहान मुलांसाठी खास असणार आहेत. तसेच ड्रेस कोड म्हणून तुम्ही पजामा ठेवू शकता जो की लाल रंगाचा असणार आहे. यामध्ये तुम्ही स्वतःला कर्म्फटेबल देखील ठेवू शकता आणि मजेदार राहून संपूर्ण पार्टी एन्जॉय करू शकता. 


फोटोग्राफी असणार लहान मुलांसाठी मजेदार 


यावेळी तुम्ही खास फोटोज काढू शकता. घरातील एका व्यक्तीला सांताक्लॉज करून तुम्ही त्याच्यासोबत खास फोटो क्लिक करू शकता. लहान मुलांना देखील नवीन कपडे लाल रंगाचे घालून तुम्ही सांताक्लॉजसोबत खास फोटो क्लिक करू शकता. तसेच सगळ्या लहान मुलांना किंवा भावा - बहिणींना एकसारखे कपडे देऊन फोटो क्लिक करू शकता. कँडिड क्षण देखील कॅप्चर करू शकता. कुटुंबासोबत तयार केलेल्या ख्रिसमस ट्रिसोबत खास फोटो क्लिक करून तुम्ही फोटो काढा. आणि सोशलम मीडियावर हे सेलिब्रेशन शेअर करू शकता. 


गरीब मुलांना गिफ्ट द्या 


आपल्या कुटुंबियांसोबतच नव्हे तर गरजू आणि गरीब मुलांसोबत देखील तुम्ही हा दिवस साजरा करू शकता. हा सण यांच्यासोबत साजरा करताना तुम्ही तुमच्या मुलांना देखील घेऊन जाऊ शकता. जेणे करून त्यांच्यात देखील 
समानतेची भावना जागृत होईल. तसेच मुलांना गिफ्टट्स आणि कपडे देऊन हा आनंद त्यांच्यासोबत शेअर करा.