मुंबई : सध्या सोशल मीडियावर ऑप्टिकल इल्युजन संबंधीत फोटो आणि व्हिडीओने लोकांना वेड लावलं आहे. लोकांना या संबंधीत प्रश्न सोडवायला फार आवडतात. कारण यामुळे मेंदूला चालना मिळते आणि आपण किती बुद्धीमान आहोत, हे जाणून घेण्यासाठी लोकांना मदत होते. आता एक ऑप्टिकल इल्युजन संबंधीत असा व्हिडीओ समोर आला आहे, जो पाहून तुम्ही तुमचं डोकं खाजवाल. पण तुम्हाला याचं उत्तर काही सांगता येणार नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओनं सर्वांनाच वेड लावलं आहे. कारण भल्याभल्या लोकांना याचं उत्तर शोधता आलेलं नाहीय.


हा व्हिडीओ इंटरनेटवर फिरत आहे आणि जगभरातील लाखो लोकांनी तो पाहिला आहे. यामध्ये एक वर्तुळ आहे ज्यावरती ब्लॉक्स आहेत. परंतु हा वर्तुळ नक्की कोणत्या दिशेने फिरत आहे. हे कोणालाच सांगता येत नाहीय.


लोक अगदी डोळ्यांना ताण देऊन आपल्या मेंदूचा 100 % वापर करुन याचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करत आहेत, परंतु ते शक्य नाही.


तुम्हाला या फोटोमध्ये काय दिसलं? व्हिडीओमध्ये 12 वेज-आकाराचे ब्लॉक्स दिसत आहेत, गोल गोल फिरत आहेत. जेव्हा तुम्ही त्यांच्याकडे टक लावून पाहाल, तेव्हा तुम्ही गोंधळून जाल. कारण हा वर्तुळ उजवीकडे आणि डावीकडे दोन्ही बाजूला फिरताना दिसत आहे.



तुम्हा हा व्हिडीओ तुमच्या मित्रांना देखील पाठवा आणि पाहा त्यांची यावर प्रतिक्रीया काय आहे.