नवी दिल्ली : १० वी आणि १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात महत्वाची आणि सुखावणारी ही बातमी. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काऊंसिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेटने १० वी, १२ वी च्या वेगवेगळ्या विषयात पासिंग गुणांमध्ये बदल केला आहे. आता दहावीच्या विद्यार्थ्यांना एकूण ३३ टक्के गुण आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना ३५ टक्के गुण पास होण्यासाठी मिळवावे लागणार आहे. 


नेमके काय केले बदल 


सीआयएससीइचे मुख्य कार्यकारी आणि सचिव गॅरी अराथून यांनी सांगितले की, हा बदल इतर देशातील बोर्डाच्या निकालानुसार केला आहे. तसेच एकरूपता आणण्याच्या विचाराने हा मोठा बदल करण्यात आला आहे. तसेच त्यांनी सांगितले की हा बदल आपल्याला २०१८-१९ या शैक्षणिक वर्षात पाहायला मिळणार आहे. 


सीआयएससीइने हा बदल मागे झालेल्या मानव संसाधन विकास मंत्रालयात झालेल्या बैठकीत मांडला होता. त्यामुळे आता दहावीच्या आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना पास होण्यासाठी अनुक्रमे ३३ आणि ३५ टक्के गुण मिळवावे लागणार आहे. या अगोदर अनुक्रमे ३५ टक्के आणि ४० टक्के मिळणे आवश्यक होते. मात्र आता हा बदल केल्यामुळे विद्यार्थी आणि पालक सुखावले आहेत. 


मंत्रालयाने बदल करण्याचे सुचवले होते 


बोर्डाकडून शाळांना आणि महाविद्यालयांना सुचविले जाते की ९ वी आणि ११ वीच्या वर्गात पास होण्यासाठी ३३ आणि ३५ टक्के गुण पास होण्याची व्यवस्था लागू करावी. हा बदल मंत्रालयाचा विचार करून करण्यात आला आहे.