भोपाळ : औद्योगिक सुरक्षा दलात (CISF) कॉन्स्टेबल, ट्रेड्समॅन भरती परीक्षेत यशस्वी झालेल्या एका तरुणाने त्याच्या जागी दुसऱ्याच एका तरुणाला परीक्षा देण्यासाठी बसवले होते. भिलाई येथील वैद्यकीय तपासणी दरम्यान, फसवणूक उघडकीस आल्यानंतर उमेदवाराला ताब्यात घेऊन गोविंदपुरा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. चौकशी दरम्यान, असे उघड झाले की, या प्रकरणात उमेदवाराने एका व्यक्तीसोबत नऊ लाख रुपयांची डील केली. यासाठी दुसऱ्या उमेदवाराला परीक्षा देण्यासाठी दोन लाख रुपये देण्यात आले होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पोलीस दोन्ही आरोपींचा शोध घेत आहेत. अशी माहिती आहे की, भोपाळच्या गोविंदपुरामध्ये दोन दिवसांपूर्वी असाच एक गुन्हा दाखल झाला आहे. गोविंदपुरा पोलीस ठाण्याचे प्रभारी अशोकसिंह परिहार यांनी सांगितले की, 21 मार्च 2021 रोजी CISF च्या कॉन्स्टेबल, ट्रेड्समनची भरती परीक्षा घेण्यात आली. त्यासाठी करिअर कॉलेजमध्ये एक परीक्षा केंद्र बनवण्यात आले.


या परीक्षेत 496 पैकी 458 उमेदवार परीक्षेला बसले होते. निकाल जाहीर झाल्यानंतर सुरवया जिल्हातील शिवपुरी येथील रहिवास, जयपाल सिंह गुर्जर यांचा मुलगा मुन्ना सिंह याची निवड झाली.


सध्या, निवडलेल्या उमेदवारांची वैद्यकीय तपासणी सीआयएसएफच्या भिलाईच्या 8 व्या बटालियनमध्ये केली जात आहे. तेव्हा त्यांची कागदपत्रेही तपासण्यात येत होती. या दरम्यान, अंगठ्याच्या बायोमेट्रिक चाचणीमध्ये, परीक्षेत दिसणाऱ्या उमेदवाराच्या बोटांचे ठसे आणि मुन्ना सिंह याच्या बोटांचे ठसे वेगळे आढळले. त्यानंतर संशयाच्या आधारावर, सीआयएसएफच्या अधिकाऱ्यांनी मुन्ना सिंह याला ताब्यात घेतले आणि त्याची चौकशी केली.


चौकशी दरम्यान मुन्नाने सांगितले की, त्याने परीक्षेत त्याच्या जागी रविकांत नावाच्या तरुणाला बसवले होते. धरमवीर सिंह हा यामागचा मास्टरमाईंड आहे. त्यानंतर मुन्नाने सांगितले की, गावातील एका व्यक्तीने त्याची धर्मवीर सिंहशी ओळख करून दिली होती. धरमवीरने नऊ लाख रुपयांमध्ये परीक्षा उत्तीर्ण करण्याचा सौदा केला होता.


त्याने दोन लाख रुपये देऊन जयपाल सिंहच्या जागी रविकांत नावाच्या तरुणाला परीक्षेला बसवले होते. त्यानंतर आता धर्मवीर सिंह आणि रविकांतचा पोलीस शोध घेत आहेत.