Crime News : पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला हत्या (Sidhu Moosewala Murder Case) प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणात आरोपी असलेल्या दोघांची तरनतारन येथील गोइंदवाल साहिब कारागृहात हत्या करण्यात आली आहे. सिद्धू मूसेवाला हत्याकांडातील आरोपी मनदीप तुफान (Mandeep Toofan), मनमोहन सिंग (Manmohan Singh) आणि केशव (Gangster Keshav) यांच्यामध्ये रविवारी संध्याकाळी रक्तरंजित चकमक झाली. यामध्ये मनदीप तुफान आणि मनमोहन सिंग यांचा मृत्यू झाला आहे. तर गॅंगस्टर केशव गंभीर जखमी झाला आहे.
 रविवारी टोळीयुद्ध सुरू झाले. आय


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला हत्येप्रकरणी तुफान आणि मनमोहन आरोपी होते. मनदीप तुफानला पोलिसांनी गँगस्टर मनी रियासह अटक केली होती. त्यानंतर रविवारी झालेल्या गॅंगवॉरमध्ये दोघांची हत्या करण्यात आली आहे. दुसरीकडे जखमी गुंड केशवला कडेकोट बंदोबस्तात तरणतारणच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. या सर्व प्रकारानंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी गोइंदवाल साहिब कारागृहात धाव घेतली आहे.


गोइंदवाल साहिब कारागृहात सिद्धू मुसेवाला खून प्रकरणातील आरोपी गँगस्टर मनदीपला कडेकोट सुरक्षा ठेवण्यात आले होती. मात्र त्याचवेळी आरोपींमध्ये बाचाबाची झाली आणि त्यांनी एकमेकांवर लोखंडी रॉडने हल्ला करण्यास सुरुवात केली. यामध्ये मनदीप तुफानचा जागीच मृत्यू झाला, तर मनमोहन सिंग मोनाचा रुग्णालयात मृत्यू झाला. 



दरम्यान, प्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला उर्फ शुभदीप सिंग सिद्धू याची 29 मे 2022 रोजी पंजाबमधील मानसा जिल्ह्यात गोळ्या झाडून निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई टोळीचा सदस्य सतींदरजीत सिंग उर्फ ​​गोल्डी ब्रार याने सिद्धूच्या हत्येची जबाबदारी घेतली होती. त्यानंतर आता मुसेवालाच्या हत्येतील दोन आरोपींची गोइंदवाल साहिब तुरुंगात हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.