हैदराबाद : हैदराबादेत साखरपुडा समारंभात हाणामारी झाली, ती देखील साखरपुड्याच्या चिकन करी न मिळाल्याने,  वधूपक्षाकडील पाहुण्यांमध्ये चिकन करीवरून जुंपली आणि यात एकाचा मृत्यू झाला. हैदराबादमध्ये सोमवारी ही घटना घडली. अन्वर असं मृताचं नाव असल्याचं सांगण्यात येत आहे. तसेच तो नवरदेवाचा चुलत भाऊ असल्याचं त्याते नातेवाईक सांगतात. 


चिकन करी ठरलं भांडणाला कारण


मिळालेल्या माहितीनुसार, या भांडणात एकूण ८ जण सामील होते. त्यातील ४ जणांवर अन्वरच्या हत्येचा आरोप ठेवण्यात आला आहे.  या प्रकरणी पोलिसांनी काही आरोपींना अटक केली आहे. त्यांच्या विरोधात हुसैनीआलम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वेटरने चिकन करी न दिल्याने हा वाद झाला असल्याचं सांगण्यात येत आहे.