Viral Video: सोशल मीडियावर रोज अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ इतके जबरदस्त असतात की आपल्याला विचार करायला भाग पाडतात. अशाच एका व्हिडीओने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. एका शाळकरी मुलांना दाखवलेली जादू पाहून नेटकरी आवाक झाले आहेत. इन्स्टाग्रामवर शेअर केलेला हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. आतापर्यंत 27 लाखांहून अधिक लोकांनी या व्हिडीओला लाईक केले आहे. तसेच कमेंट्स करत मुलाच्या प्रतिभेचे कौतुक केलं आहे. त्याचबरोबर काही जणांनी ही कला पुढे नेण्याचा सल्लाही दिला ​​आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काय आहे व्हिडीओमध्ये?
व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, विद्यार्थ्याच्या आजूबाजूला त्याच्या वर्गातील इतर काही विद्यार्थी दिसत आहे. सर्वजण त्याच्याभोवती उभे आहेत. काहीतरी वेगळं दाखवणार असं दिसतंय. विद्यार्थी आपले दोन्ही हात पुढे करतो आणि त्यात ठेवलेले संगमरवरी गोट्या दाखवतो. नंतर काय होते तुम्ही हा व्हिडीओ पाहा.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

A post shared by Sahil Saifi (@sahil.aazam)


मुलगा थोड्या वेळाने हात फिरवतो आणि गोट्या खाली ठेवतो, त्यानंतर त्याच्या दोन्ही हाताखाली संगमरवरी गोट्या दोन्ही हातात असायला हव्या होत्या. पण दोन्ही संगमरवरी गोट्या त्याच्या एकाच हातात दिसतात. हे पाहून तिथे उपस्थित सर्व मुले देखील आश्चर्यचकित होतात आणि आनंदी होतात.