Cleaning Hacks: पिवळ्या पडलेल्या बाथरूमच्या टाईल्स चमकतील नव्यासारख्या...घरच्या घरी हा उपाय करूनच पाहा
Bathroom Cleaning Tips : बाथरूमच्या टाइलला व्हिनेगरच्या मदतीने पॉलिशही करता येते. यासाठी बादलीत कोमट पाणी घ्या आणि त्यात व्हिनेगर (vinegar to cleaning) मिसळा. यात कापड बुडवून बाथरूमच्या टाइल्स स्वच्छ करा.
How to Clean bathroom Tiles: घरात साफसफाई (house cleaning ideas ) काढली कि गृहिणींच्या नाकी नऊ येतात, छोट्या मोठ्या जागेवरची साफसफाई होऊन जाते पण घरात काही अश्या ठिकाणी साफसफाई कारण म्हणजे मुश्किल होऊन बसतं, जस कि बाथरूम , त्यात बाथरूमला सफेद रंगाच्या टाईल्स असतील तर मात्र आणखी वैताग येतो कारण नवीन असताना या सफेद टाईल्स फार चकाकतात पण कालांतराने याच सफेद टाईल्स खराब होऊ लागतात आणि एक वेळ अशी येते कि त्यावर पिवळा थर जमा होतो. आपण दररोज घराची साफसफाई करतो, मात्र घरात अशा काही जागा असतात ज्या लवकर स्वच्छ होत नाहीत. त्या स्वच्छ करण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागता. यापैकी एक म्हणजे बाथरूमची फरशी. पांढऱ्या फरशा स्वच्छ करणे हे मोठ कठीण काम आहे. पण आज अशा काही टिप्स जाणून घेऊया ज्याद्वारे तुम्ही बाथरूमच्या पिवळ्या झालेल्या टाईल्स कशा चमकवू शकता. ( how to clean bathroom yellow tiles like shiny with this cleaning hacks easily in marathi )
बेकिंग सोडा (baking soda )
गलिच्छ बाथरूम टाइल्स साफ करण्यासाठी तुम्ही बेकिंग सोडा वापरू शकता. यासाठी एका भांड्यात बेकिंग सोडा घ्या आणि त्यात पाण्याचे काही थेंब टाका. आता हे मिश्रण स्पंजच्या मदतीने टाइल्सवर लावा आणि घासून घ्या. यानंतर कोमट पाण्याने टाइल्स धुवा.
व्हिनेगर (vinegar)
बाथरूमच्या टाइलला व्हिनेगरच्या मदतीने पॉलिशही करता येते. यासाठी बादलीत कोमट पाणी घ्या आणि त्यात व्हिनेगर मिसळा. यात कापड बुडवून बाथरूमच्या टाइल्स स्वच्छ करा. यासाठी तुम्ही स्पंज देखील वापरू शकता.
मीठ (salt)
गलिच्छ बाथरूम टाइल्स साफ करण्यासाठी तुम्ही मीठ देखील वापरू शकता. यासाठी कापडावर थोडे मीठ घेऊन बाथरूमच्या टाइल्स स्वच्छ कराव्या लागतील. रात्रभर असेच राहू द्या. यानंतर दुसऱ्या दिवशी कोमट पाण्याने धुवा.
लिंबू आणि बेकिंग सोडा (lemon and baking soda)
लिंबू आणि बेकिंग सोडाच्या मदतीने तुम्ही बाथरूमच्या टाइल्स देखील स्वच्छ करू शकता. यासाठी एका भांड्यात दोन चमचे बेकिंग सोडा घ्या आणि त्यात लिंबाचा रस मिसळा. स्पंजच्या मदतीने टाइल्सवर घासून घ्या. नंतर स्वच्छ पाण्याने धुवा. पांढऱ्या फरशा नव्यासारख्या चमकतील. (( how to clean bathroom yellow tiles like shiny with this cleaning hacks easily in marathi ))