नवी दिल्ली : देशात पुन्हा एकदा मान्सून (Monsoon) सक्रीय होताना दिसत आहे. डोंगराळ भागात जोरदार पाऊस होत आहे. तर दुसरीकडे हिमाचल प्रदेश (Himachal Pradesh) च्या कांगड़ा जिल्ह्यात ढगफुटीमुळे (Cloud Burst) मोठं नुकसान झालं आहे. हवामान खात्याने (IMD) येत्या 48 तासात मुसळधार पावसाचा (Heavy Rain) इशारा दिला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हवामान खात्याने म्हटलं की, येत्या 48 तासात मुसळधार पाऊस होऊ शकतो. या दरम्यान ढगफुटी देखील होऊ शकते. हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट (Orange Alert) जारी केला आहे आणि लोकांना सावध राहण्याची सूचना दिली आहे.



उत्तर भारतात मान्सून सक्रीय


हवामान खात्याने म्हटलं की, राजस्थान आणि पंजाबच्या काही भागात मान्सून पोहोचला आहे. दिल्लीत स्थिती चांगली आहे. उत्तर भारतात अनेक ठिकाणी मान्सून अॅक्टीव असून हिमाचल आणि उत्तराखंडमध्ये ही पावसाचा इशारा दिला आहे.


सोमवारी हिमाचलच्या कांगडा जिल्ह्यात ढगफुटी झाली. ज्यामुळे मोठं नुकसान झालं. नद्यांच्या पातळीत अचानक वाढ झाली. नद्यांच्या आजुबाजुच्या गावांना सतर्क करण्यात आले आहे.



गृहमंत्री अमित शाह (Home Minister Amit Shah) यांनी हिमाचलचे मुख्यमंत्री जयराम ठाकुर (Jairam Thakur) यांच्यासोबत चर्च करुन परिस्थितीचा आढावा घेतला आणि मदतीचं ही आश्वासन दिलं. NDRF च्या टीम या भागात पोहोचत आहेत.



पंतप्रधान मोदींनी ही या घटनेची माहिती घेऊन या बाबत केंद्राकडून मदतीचं आश्वासन दिलं आहे.