जयपूर : राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत वादग्रस्त विधानामुळं चर्चेत आले आहेत. राजस्थानातल्या कोटाच्या जेके लोन रुग्णालयात मुलांच्या मृत्यूसंबंधी गेहलोत यांनी टिप्पणी केली होती. 'हे काय विशेष नाही, देशातील रुग्णालयात दररोज 3 ते 4 मुलांचा मृत्यू होतोच', असं विधान गेहलोत यांनी केलं होतं. मागील 6 वर्षाच्या तुलनेत यंदा मुलांचा कमी मृत्यू झाला आहे. असा दावाही गेहलोत यांनी केला आहे. दरम्यान, महिनाभरात जेके लोन रुग्णालयात 77 हून अधिक मुलांचा मृत्यू झाला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी म्हटलं की, त्यांचं वक्तव्य चुकीच्या पद्धतीने समोर आणलं गेलं. काही लोकं जाणून बुजून हे करत आहेत. माध्यमांमध्ये जे चाललंय ते निंदनीय आहे. 'निरोगी राजस्थान' बाबात आमच्या सरकारने योजना सुरु केली आहे. आरोग्य क्षेत्रात राजस्थान सर्वोच्च स्थानी यावे यासाठी आम्ही काम करत आहोत. 'निरोगी राजस्थान' हे आमचं ध्येय आहे. आम्ही यावर लक्षकेंद्रीत केलं आहे. राज्यात फ्री उपचार आहेत. जे कोठेही नाही. एकमेव असं राज्य आहे आहे जेथे आउटडोर पेशेंटला ही फ्री औषधं मिळतात.'


राजस्थान सरकारच्या आरोग्य विभागाने जारी केलेल्या माहितीमध्ये म्हटलं आहे की, 2014 मध्ये 15719 मुलं भर्ती झाले ज्यामध्ये 1198 मुलांचा मृत्यू झाला होता. 2015 मध्ये 17579 मुलं दाखल झाले ज्यामध्ये 1260 मुलांचा मृत्यू झाला. 2018 मध्ये 16436 मुलं दाखल झाले ज्यामध्ये 1005 मुलांचा मृत्यू झाला. तर 2019 मध्ये 16892 मुलं दाखल झाले ज्यामध्ये 940 मुलांचा मृत्यू झाला.


मुख्यमंत्री अशोक गेहलोत सध्या चांगलेच वादात सापडल्याने विरोधकांनाही त्यांना घेरण्याचा प्रयत्न केला आहे.