नवी दिल्ली : Maharashtra cabinet expansion : दिल्लीत महाराष्ट्र मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चेला वेग आला आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या भेटीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेतली. त्याआधी अमित शाह यांची भेट घेतली. यावेळी मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा झाल्याची माहिती मिळतेय. शिंदे-फडणवीस आज पंतप्रधान मोदी यांनी भेट घेणार आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची अमित शहा यांच्यासोबत साडे चार तास बैठक झाली. मंत्रिमंडळात नवीन चेहऱ्यांना संधी देण्याबाबत चर्चा झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. तब्बल साडेचार तास त्यांची बैठक झाली. या बैठकीत मंत्रिमंडळासंदर्भात चर्चा झाली. 


आज फडणवीस आणि शिंदे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. नव्या मंत्रिमंडळात नव्या आणि तरूण चेह-यांना संधी देण्याबाबत शाह यांच्याशी चर्चा झाली. शिंदे आणि फडणवीस दोन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्यांनी शिवसेनेच्या याचिकेबाबत विधिज्ञांसोबतही चर्चा केली. तर शिवसेनेचे निवडणूक चिन्हं तसेच विधानसभा अध्यक्ष आणि राज्यपालांवर घेतलेल्या आक्षेपांबाबत चर्चा झाली.