नवी दिल्ली : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीमध्ये दोघांमध्ये अनेक महत्त्वाच्या मुद्यांवर चर्चा झाली.


उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री बनल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत त्यांची ही तिसरी अधिकृत भेट आहे. याआधी ९ एप्रिलला दोघांची भेट झाली होती.